खळबळ आहे. अखेर संजय राऊत यांचा नंबर लागला. गेली काही महिने ईडीशी खाजवणारे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राउत यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. संजय राऊत यांचे अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एक फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. ह्या कारवाईने महाआघाडीमध्ये खळबळ आहे. मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.
पण दबतील तर ते संजय राउत कसले? या कारवाईनंतर संजय राऊतांनी “असत्यमेव जयते” असं सूचक ट्वीट देखील केलं आहे. राऊत म्हणाले, कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली. एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत.
“२००९ची मालमत्ता आहे. एक एकरही पूर्ण जागा नाही. आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत. ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला. राजकीय सूड कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय, ते तुम्ही पाहिलं असेल”, अशा शब्दांत ते कडाडले आहेत.
अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये आहेत. हे दोघे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री होते. आता ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवे हात संजय राऊत यांना रडारवर घेतल्याने महाआघाडी हादरली असणार. उद्धव आणि त्यांचे सेना आता काय खेळी खेळते याकडे राज्याचे लक्ष आहे.
359 Total Likes and Views