*विरंगुळा*
सकाळी सकाळी
बायकोचा
हसरा चेहरा बघा.
दिवस मस्त जातो.
-पु ल देशपांडे.
मग बायको……
कुणाची पण असो!

डॉक्टर : हा बोला,
कुठं दुखतंय..?
पेशंट : फी कमी
करणार असाल
तर सांगतो,
नाहीतर शोधा!

पुण्यात हल्ली
खूप
चहाची दुकाने निघालीत..
येवले चहा
सायबा चहा
कडक चहा
हरमन चहा
मायेचा चहा
प्रेमाचा चहा…..
मी एका पुणेकराला
सहज प्रश्न विचारला.
या सगळ्यात
कोणता चहा चांगला?
तर तो म्हणाला…
*फुकटचा चहा!*

नवरा : मला
आजपर्यंत समजलेले नाही की
टीव्हीवर दररोज
नवनवीन
रेसिपीचा कार्यक्रम
बघून सुद्धा
घरी
खिचडीच का होते ?
बायको:
हेल्दी आहे ते…
सगळे जसे
किंगफिशरचे कँलेडर बघून घरात कालनिर्णयच लावतात ना,
आगदी तस्सेच असते
हे सुद्धा!

मुंबईकर:
तुमच्याकडे गणपती
किती दिवस बसतो?
पुणेकर:
दिड दिवस !
मुंबईकर:
किती हा चिकटपणा ?
पुणेकर:
तुमच्याकडे किती दिवस बसतो ?
मुंबईकर :
दहा दिवस
पुणेकर :
गणपती कशाची देवता आहे ?
मुंबईकर :
बुद्धीची !
पुणेकर :
मग बरोबर आहे,
आम्हाला दिड दिवस पुरतो!

दुकानदार –
साहेब, काय देऊ?
ग्राहक –
होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या!
दुकानदार –
बांधून देऊ की
इथेच खाणार?

मुंबईत
समुद्राजवळ रहाणाऱ्यांनी कृपया
धोतर व टोपी घालू नये! वादळ घुसलं तर
पॅराशुट होईल!

पुण्यातील
सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी
*IIअतिथि देवो भव II*
परंतु
देवांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपापली
पुष्पक विमाने
सोसायटीच्या बाहेरच
पार्क करावीत!

मुलगा-
मी तुमच्या मुलीवर
10 वर्षांपासून
प्रेम करतोय!
पुणेरी वडील –
मग आता काय
पेन्शन मागायला आलायस ?

भिकारी :
साहेब
खूप भूक लागली आहे.
५ रुपये द्या ना!
पुणेकर :
१०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी :
हो आहेत ना साहेब.
पुणेकर :
अरे मग
आधी ते खर्च कर!

स्थळ :-
सदाशिव पेठ
गिऱ्हाईक :
“हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?”
दुकानदार :-
“वीस रुपयापासून
पाच हजार रुपयांपर्यंत आहेत!”
गिऱ्हाईक :-
“वीस रुपयांचे बघू.”
दुकानदार:-
“हे घ्या…
कानात एक बटण
आणि कानातून
शर्टाच्या खिशात
एक वायरचा तुकडा सोडायचा!”
गिऱ्हाईक :-
“हे कसं काम करतं?”
दुकानदार :-
“काहीच काम करत नाही. पण ते बघून
सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतील!
पुण्यात
सर्वात जास्त खप असलेलं हेच एकमेव यंत्र आहे!”

कधी विचार केला का
आपण
M सरळ
आणि
W उलटे का लिहितो?
कारण
Men
सरळ विचार करतात
आणि
Women
उलटे!

काल मी
लिफ्टने वर जात होतो, त्यावेळी एका बाईने
लहान मुलासह
लिफ्टमध्ये प्रवेश केला.
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले:
“दुसरा की तिसरा”?
बाईंनी रागानेच सांगितले
आत्याचा मुलगा आहे.
माझे अजून
लग्न नाही झाले!

*लॉकडाऊन पर्यटन!*
पुण्यात पाटी लागली
*स्विगी आणि झोमॅटोचा ड्रेस* भाड्याने मिळेल!
मनसोक्त
फिरण्याचा आनंद घ्या!

शेजारच्या वहिनी
बायकोला म्हणाल्या… तुमचे साहेब
खूप हुशार आहेत.
माझ्या चेहऱ्यावर
मास्क असूनही
मला
ओळखलं
व हसलेसुद्धा…!
आता
घरातलं लॉकडाऊन आणखी कडक झालंय …!

काल एका
जुन्या मित्राला
चार पाच वेळा कॉल केला पण त्याने
उचललाच नाही!
मग
आज मी
एक मेसेज पाठवला …
आपल्या वर्गातील
‘स्वाती’ आठवते ना!
ती काल भेटली होती.
तुझा नंबर विचारत होती. देऊ का ?
सकाळपासून
किमान 15 वेळा
फोन केला पठ्ठ्याने.
मग काय
मी पण उचलला नाही!

*पुणेकर v/s पुणेकर*
पहिला पुणेकर –
तुम्हाला आमरस देऊ
की बासुंदी ?
दुसरा पुणेकर –
घरात
एकच वाटी आहे का ?

कावळ्याने
माठाला विचारले,
“तुला
आगीमधे भाजून
तयार केलं जातं,
तरीही तू
एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल,
इतकं थंड
कसं काय ठेवू शकतोस?”
माठानं
फारच सुंदर उत्तर दिलं… म्हणाला:
बाष्पीभवन,
उष्णता शोषण प्रक्रिया आहे ही!
त्यासाठी डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं.
माझ्या पृष्ठभागावर
जी सूक्ष्म छिद्रं आहेत, ज्यावर
थर्मोडायनेमिक्सच्या नियमांनुसार
कूलिंग इफेक्ट जनरेट होतो!
कावळ्याने मग
मनाशी खुणगाठ बांधली की इथून पुढे
नको त्या चौकशा
करायच्या नाहीत!
कावळा कुठला होता
माहित नाही पण..
माठ पुण्याचाच होता!

याला अपमान म्हणावं
की प्रेम?
नवऱ्याने,
बायकोला विचारले:
“तुला
हँडसम नवरा आवडतो
की हुशार?”
बायको:
“दोन्हीही नाही….
मला तुम्हीच आवडता!”

रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून
मुलाने विचारले :
ही कोण ?
मम्मी म्हणाली :
आत्या.
पप्पा म्हणाले :
मावशी.
मग काय
रामायण संपले
आणि
महाभारत चालू झाले!

सध्या
करोना म्हटलं की
लोकांना लगेच
*काळजी घ्या*
म्हणण्याची
इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर
न वाचता
काळजी घ्या
ठोकून देताहेत!
मी पोस्ट टाकली होती…
कोरोनामुळं
माझ्या आयुष्यात पहिल्यांदा
मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय!
माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे जणांनी काळजी घ्या
असा सल्ला दिला!

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मी एक गादी
व दोन उश्या घेतल्या !
आखीर वो भी तो
‘सोने’ की चीज है ना!

पहिली लाट,
दुसरी लाट,
तिसरी लाट
च्यामारी…
समजतच नाहीये
आपण
जमिनीवर राहतो
की समुद्रात!

तुम्हीसुद्धा हसा व
दुस-यांना पण हसवा!

201 Total Likes and Views