खासगी शाळांमध्ये बाऊन्सर ठेवण्याचे प्रस्थ वाढले आहे. शाळेत जाऊ पाहणाऱ्या पालकांना धक्काबुक्की करेपर्यंत ह्यांची मजल गेली आहे. पुण्यात एका शाळेत मागे हा प्रकार घडला तेव्हा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या त्यावेळी सूचना दिल्या होत्या. पण कोणी ऐकायला तयार नाही. पुण्यातल्या बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर तिथल्याच उंड्री येथील युरो शाळेत बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे टीसी पाठवले. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला आहे. या बाबत विचारायला पालक शाळेत गेले तर त्यांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली. आपबिती सांगताना एका मुलाची आई म्हणाली, मी माझ्या मुलाला शाळेत सोडायला आणि फी भरायला गेले होते. मात्र, शाळा प्रशासन फी घेण्यास तयार नव्हते आणि मुलालाही शाळेत घेण्यास तयार नव्हते. उलट मला शाळेच्या बाहेर काढण्यास बाऊन्सर्सच्या माध्यमातून धक्काबुक्की करण्यात करण्यात आली. दुसरा एक पालक म्हणाला, मुळात शिक्षण संस्थांना खासगी बाऊन्सर्स ठेवण्याची गरजच काय ? शाळा आता पवित्र मंदिर राहिलेल्या नाहीत. व्यवसाय झाल्या आहेत. त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. नेत्यांच्याच शाळा असतील तर कोण कोणावर कारवाई करणार?
165 Total Likes and Views