मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही स्वतःच स्वतःची परीक्षा घ्या

Analysis
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या आपल्या कार्यक्रमाच्या ५व्या भागामध्ये देशभरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मोदी म्हणले, परीक्षा हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे.  स्वतः ला तपासा, मोबाईलमध्ये गुंतू नका, स्वतःमध्ये गुंता, भरपूर खेळा  असा सल्ला त्यांनी मुलांना दिला.  विद्यार्थ्यांच्या  सहीसाठी मोदींनी खिशातून पेन काढला  तेव्हा सारे चाट पडले.


                 ह्या कार्यक्रमात मुलांनी खूप सारी प्रश्नं विचारली. अभ्यास सकाळी करावा की संध्याकाळी, खेळण्याच्या आधी करावा की खेळण्यानंतर, उपाशीपोटी करावा की पोटभर जेवून, ह्या प्रश्नांना  उत्तर देताना  मोदी म्हणाले की, मला एक चित्रपट आठवतोय, ज्यात रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीला मोठ्या बंगल्यात राहण्याची संधी मिळते. तिथे त्याला झोप येत नव्हती. म्हणून तो रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे गाड्यांचा आवाज रेकॉर्ड करतो आणि परत येऊन तो आवाज ऐकून मग झोपी जातो. याचा आशय असा की आपल्याला आराम मिळणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्वतःचं मूल्यांकन करा आणि बघा की तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास केल्याने आराम मिळतोय.


               त्यांनी  विद्यार्थ्यांना सांगितलं, की एक दिवस तुम्ही परीक्षेलाच पत्र लिहा.  लिहा की, मी पूर्णपणे तयार आहे, हिंमत असेल तर माझी परीक्षा घ्या. अरे तू काय माझी परीक्षा घेणार, मीच माझी परीक्षा घेईन.

       खेळल्याशिवाय तुम्ही खुलणार नाही. आपल्या प्रतिद्वंदीच्या आव्हानांचा सामना करणं आपण त्यातून शिकतो. पुस्तकं आपल्याला जे शिकवतात, ते आपण खेळाच्या मैदानातही शिकू शकतो. मात्र आता खेळण्याला शिक्षणापासून वेगळं करण्यात आलं आहे. पण आता बदल होत आहेत आणि आणखी बदल अवश्य होतील असे ते म्हणाले.


               मोदी म्हणाले,  सोशल मीडिया आणि मोबाईल गेमिंगच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठीही उपाय आहे. जेवढी मजा मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुंतून राहण्यात आहे, तेवढीच मजा स्वतःमध्ये गुंतण्यातही आहे. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन-ऑनलाईनच्या ऐवजी इनरलाईन राहायला हवं. एकाग्रतेने अभ्यास केला तर मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहता येऊ शकतं.  मनात एक गोष्ट पक्की करून घ्या, की परीक्षा हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपल्या विकासाचा हा एक छोटा टप्पा आहे. या टप्प्यातून आपण आधीही गेलेलो आहोत. आपण याआधीही अनेकदा परीक्षा दिलेली आहे. जेव्हा मनात विश्वास निर्माण होतो, तेव्हा येणाऱ्या परीक्षेसाठी हा अनुभव आपली ताकद बनते.

 153 Total Likes and Views

0 Comments

No Comment.