भाजपला पाहिजे लाऊडस्पीकरवरील अजान बंदी

News
Spread the love

लाऊडस्पीकरवरील अजान बंद झाले पाहिजेत अशी अचानक मागणी करून भाजपने एका सेन्सिटिव्ह विषयाला छेडले आहे.  राजकीय नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया त्यावर उमटल्या आहेत.   भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसहीत महाराष्ट्रभरातील लाऊडस्पीकरवरील अजान बंद झाले पाहिजेत अशी पक्षाची भूमिका असल्याचं म्हटलं आहे.

                            लाड म्हणाले, दिवसातून पाच वेळा अजानचा भोंगा वाजतो. त्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. आम्ही धर्माला विरोध करत नाहीय. पण धर्माच्या माध्यमातून ज्यापद्धतीने धर्म बळकावण्याचा काम करतायत त्याला आमचा विरोध आहे. पूर्वीच्या काळी अजान याच्यासाठी वापरला जायचा की पाच वेळा नमाज पडत असताना वेळ कळावी. लोकांनी झोपेतून उठावं नमाझ पठण करावं यासाठी अजानचा आधार घेतला जायचा.  जुन्या काळामध्ये वेळ कळण्यासाठी अजानचा वापर केला जायचा. पण आज सगळ्यांकडे घड्याळं, मोबाईल आहेत त्यामुळे आता अजानची गरज नाही असे लाड म्हणतात.

      शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळेस भाजपने हा मुद्दा का काढला नाही?  उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत्या. तिथे मशिदी नाहीत का? मग तिकडे मशिदींवर लाऊड स्पीकर्स नाहीत का? देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते. गृहखातं त्यांच्याकडे पाच वर्ष होतं. तेव्हा त्यांना हे सगळं सुचलं नाही. आता हे सगळे विषय मुद्दाम हिंदू-मुस्लीम दंगे व्हावेत यासाठी आहेत. जे सगळे एकोप्याने राहतायत, त्यात कुठेतरी दंगे व्हावेत, त्या दंग्यांचा फायदा भारतीय जनता पार्टीला व्हावा हाच यामागील हेतू आहे. राहिला विषय लाऊडस्पीकरचा तर त्याबद्दल न्यायालयाचे निकाल आहेत.

 246 Total Likes and Views

0 Comments

No Comment.