इलेक्ट्रिक गाडीच्या मृगजळामागे धावण्याआधी…..

Business Hi Special
Spread the love

महत्वाचे……
*ELECTRIC गाडीचे बुकिंग करणे योग्य आहे की अयोग्य.. ही निवड व्यवहार्य आणि योग्य आहे ..*

अतिशय चुकीचा निर्णय
*कंपनी अपप्रचाराला मार्केटिंग ला भुलू नका,* माझा मित्रा कडे नेक्सोन इ व्ही आहे , कंपनी ने ३०० किमी ची रेंज सांगितली आहे पुण्यावरून गाडी घेतली मिरज ला राहतो तिकडे गाडी दाखवायला गेला , गाडी शोरूम मधेच फुल चार्ज करून घेतली .
*पुणे ते मिरज अंतर २५० किमी आहे , गाडी १८० किमी वर बंद पडली , *battery शून्य टक्के पूर्ण उतरली*
शोरूम ला फोन लावला*, ते बोलले गाडी २५०-३०० किमी चालेल पण ए सी बंद हवा, म्युझिक सिस्टिम बंद हवी* . शिवाय स्पीड ५०-६० चाच हवा , मित्राचा संताप झाला हे आधी सांगितले असते तर गाडी घेतली च नसते , चार चाकी कोणी ५०-६० ने चालवते का , शोरूम म्हणाली हि पेट्रोल/डीझेल गाडी नाही मर्यादा असणारच .
शोरूम म्हणाले कस्टमर केअर ला संपर्क करून टो करून देतो, नवी गाडी टो करून न्यावी लागली घरी आणि मित्र मंडळीत हसे झाले शिवाय १५०० रुपये टो चार्जेस लावले ते वेगळे
बी एम एस म्हणजे battery management सिस्टीम सुमार आहे . *क्षणात गाडी ८०% चार्जिंग दाखवत असताना अचानक ३०-४०% दाखवायला सुरवात करते*
*सर्वात महत्वाचे गाडी कुठेही चार्ज होत नाही*, अप प्रचाराला बळी पडू नका ,त्या ला वेगळा सेट अप लागतो जो प्रत्येक ठिकाणी असेलच असे नाही
शिवाय पेट्रोल टीगोर आणि याची तुलना करा किमतीची
पेट्रोल टीगोर ६.८४ पासून सुरवात होते तर *इ व्ही १२.७० लाख पासून*
समजा तुमची पेट्रोल tigor १८ चा मायलेज देते असे गृहीत धरले आणि पुढील ५ वर्षात सरासरी भाव १२५ रुपये लिअर धरला तरी वर्षाचे १० हजार असे ५ वर्षात ५० हजार किमी चालवली तर २७७८ लिटर पेट्रोल लागेल म्हणजेच पुढील ५ वर्षात तुम्ही ३४७००० हजार रुपयांचे पेट्रोल टाकणार
आता तुम्ही स्वतःच तुलना करा तुम्हाला काय परवडले .
इलेक्ट्रिक हे भविष्य नाही , इथेनॉल , हायड्रोजन हे भविष्य आहे
*टाटा असो वा एम जी कि हिरो इलेक्ट्रिक ९०% पार्टस चीन वरून येतात*
स्वतः तुलना करा मग निर्णय घ्या *जर १२-१५ लाख घालून तुम्ही जर मुंबई-नाशिक रिटर्न येऊ शकत नसाल तर असला निर्णय काय शहाणपणाचा आहे का*
शिवाय चार्जिंग ला *३० युनिट* लागतात कोणताही हॉटेल वाला तुम्हाला चार्ज करू देणार नाही
स्वतः शोरूम आणि त्यांचे चार्जिंग सेंटर चार्ज करून द्यायचे ४५०-५०० रुपये घेतात
चार्जिंग चा खर्च गृहीत न धरता देखील इ व्ही गाडीला तुम्ही पुढील ४-५ वर्ष पेट्रोल चे पैसे फुकट भरले आहेत ते देखील २००-२५० किमी एवड्या कमी अंतरासाठी
कंपनी सांगते *एका तासात fast चार्जर ने गाडी चार्ज होते पण हे सांगत नाही दर तिसऱ्या वेळी स्लो चार्जर नेच चार्ज करावी लागते .*
*शिवाय रिसेल किमंत शून्य*
कंपनी ८ वर्षांची waranty देते त्याचा टर्म वाचल्यात का , दर वर्षी १०-१५% रेंज कमी होत जाणार हे तुम्हाला शोरूम किंवा कंपनी कधीच सांगत नाही ,
*पहिल्या वर्षी असलेली २५०-३०० ची रेंज ५ वर्षात १००-१५० वर येणार तेव्हा ती गाडी नंतर खेळणे म्हणून द्यावी लागेल मुलांना*
nexon चा ए आर ए आय मायलेज ३१२ सांगितला जातो मात्र अनेक लोकांना वास्तवात २१० पेक्षा कमी मायलेज मिळत आहे*
पेट्रोल/डीझेल गाडी रस्त्यात बंद पडली तर कोणताही फिटर ती दुरुस्त करू शकतो , तसे इलेक्ट्रिक चे नाही, इलेक्ट्रिक गाड्यांचे आजही शोरूम वेगळे नाहीत, शोरूम मधील फिटर ला *इलेक्ट्रिक गाडी दुरुस्त करता येत नाही , यातील अनेक पार्टस वापरा आणि फेकून द्या या प्रकारचे आहेत. रस्त्यात गाडी बंद पडली तर टो करून नेणे या पेक्षा वेगळा पर्याय आज तरी नाही…,,*

 284 Total Likes and Views

0 Comments

No Comment.