महाराष्ट्राची आंदोलने अराजकतेकडे

Hi Special
Spread the love

अलिकडे महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत घाणेरडे झालेले आहे.  त्या राजकारणाला आणखी गलिच्छ करणारे काम कोणाच्या डोक्यातून िनघाले, त्याची चौकशी फार गांभीर्याने झाली पाहिजे. श्री. शरद पवार साहेब यांच्या घरावर एस. टी. संपकऱ्यांचा कट करून मोर्चा गेला. दगडफेक झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही नेत्याच्या घरावर गेल्या ६०-६२ वर्षांत असा मोर्चा गेला नव्हता. कोणत्याही मोर्चाला पोलीस खात्याची परवानगी लागते. पण हा मोर्चा नव्हता. हा हुल्लडबाजांचा एक गट होता. त्या गटाने ठरवून काम केले. एस. टी. संपकऱ्यांच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्राला पूर्ण सहानुभूती आहे. एस. टी. िटकली पािहजे, ती मोडता कामा नये, खासगी वाहतुकदारांच्या घशात ती जाता कामा नये, याबद्दल दुमत नाही. पण आपल्या मागण्यांसाठी देशाच्या एका सर्वश्रेष्ठ नेत्याच्या घरावर हुल्लडबाजांनी दारापर्यंत धडक मारावी, ही घटना महाराष्ट्र ‘िबहार’कडे चालल्याचे लक्षण आहे. केवळ निषेध करून हा विषय संपत नाही. गृहखात्याला त्याच्या खोलात गेले पािहजे. कोणाच्या डोक्यातून हे धडक मारणे सूचले, याच्या तळापर्यंत गेले पाहिजे. दिलीप वळसे-पाटील आिण त्यांचे गृहखाते खोलात जाईलच. पण, आठ दिवसांत याच्या मागचे डोके कोणाचे, हे महाराष्ट्राला कळले पाहिजे.
पवारसाहेबांच्या ६० वर्षांच्या राजकारणात त्यांनी कधीही कामगार विरोधी, शेतकरी िवरोधी भूमिका घेतलेली नाही. ७ िडसेंबर १९८० ते २३ िडसेंबर १९८० अशी तब्बल १६ िदवस जळगाव ते नागपूर ४०० िकलोमीटरची पायी चालत गेलेली शेतकरी िदंडी पवारसाहेबांच्या नेतृत्त्वाखालीच िनघाली होती. ते सत्तेत असताना त्यांनी कामगार विरोधी, शेतकरी िवरोधी िनर्णय कधी घेतले नाहीत. पहिल्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात (१८ जुलै १९७८) शपथ घेतल्यावर पवारसाहेबांनीच राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय दराने महागाई भत्ता ही घोषणा केली होती. विरोधी पक्षात असताना  त्यांनी शेतकरी, कामगारांचा आवाज केवळ पत्रकार परिषदा घेवून बुलंद केला नाही तर ४०० िकलोमीटर पायी चालून एक इितहास घडला. शरद पवार, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू या सर्व नेत्यांना तेव्हा अटकही झाली. विरोधी पक्षात असताना विरोध पक्षनेत्याच्या जबाबदारीने त्यांनी काम केले. दत्ता सामंत यांच्या अत्यंत अतिरेकी धोरणामुळे मुंबईतील गिरणी कामगारांना देशोधडीला जावे लागले. त्यावेळीही ‘िकती ताणायचे’ हे शरद पवारसाहेब सांगत होते. आजपर्यंत कोणत्याही आंदोलनाच्या िवरुद्ध त्यांनी कधीच भूमिका घेतली नाही. विषय एवढ्यापुरता मर्यादित नाही.अगदी धरून चालू या, एखाद्या नेत्याने विरोधात भूमिका घेतली तरी त्याच्या घरावर धडकण्याची ही पद्धत महाराष्ट्र भरकटल्याचे लक्षण आहे. त्यातही पवारसाहेबांसारख्या नेत्याच्या घरावर झालेला प्रकार हा संपूर्ण कामगार आंदोलनाला बदनाम करणारा आहे. कामगारांची बाजू घेणारे जे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लोक आहेत, त्याच नेत्याच्या घरावर धडकणार असाल, तर महाराष्ट्र अराजकाकडे चालला, असे मानायला हवे. महाराष्ट्राच्या सभ्यतेच्या राजकारणावरच ही धडक आहे. आिण आज एकूण जे काही घाणेरडे राजकारण चालले आहे त्यात या निंद्य घटनेमुळे कळस गाठलेला आहे. सुप्रियाताईंचे अिभनंदन केले पाहिजे. राजकीय नेत्याची लेक म्हणून नव्हे, एक सामािजक दायित्त्व म्हणून त्या धडकणाऱ्या लोकांच्या समोर िहंमतीने सुप्रिया उभी राहिली….ितने खडे बोल सुनावले. दगड मारून, िशवीगाळ करून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न चर्चेने सुटेल…. हे तिने िहमतीने सांिगतले. या सर्वच घटनेत शरद पवार यांनी मांडलेली भूमिका त्यांच्या परिपक्व नेतृत्त्वाचीच साक्ष देणारी होती. आंदोलनाला त्यांचा विरोध नव्हता आिण नाही. विरोध पद्धतीला आहे. याच जागेवर मी ‘एस. टी. मोडू नका’ असे चार वेळा लिहिले… एस. टी. कामगारांच्या काही मागण्या अति टोकाच्या होत्या. पण त्यात तडजोड करता आली असती. जर एका सार्वजनिक उपक्रमाला सरकारी सेवेत सामावून घेतले तर असे अनेक सार्वजनिक उपक्रम आहेत. त्यामुळे ही मागणी टोकाची होती. पण प्रत्येक कामगार संघटना, शांततामय मार्गाने संप करताना टोकाची मागणीच करते. आिण नंतर तडजोड होते. आमच्या जॉर्ज फर्नांडीस यांनी ऐन पावसाळ्यातच महापािलका सफाई कामगारांचे अनेक संप केले. कॉम्रेड डांगे यांनी गिरणी कामगारांचे अनेक लढे लढवले… संप केले… संप कधी सुरू करायचा यापेक्षा, तो कधी मागे घ्यायचा, हे समजणाराच कामगार नेता यशस्वी होतो. ज्याला हे समजत नाही, त्याचा दत्ता सामंत होतो. एस. टी. च्या कामगारांनी शरद पवारसाहेब यांच्या घरावर धडक देण्यात केवळ राजकीय चूक केलेली नाही तर सामािजक अपराधही केलेला आहे. आिण महाराष्ट्राचे पुढच्या राजकारणाचे एकूण वातावरण कसं होईल, हे या घटनेतून लोकांच्यासमोर आले. अशी धडक दिली जाणार आहे, याचा अंदाज पाेिलसांना आला की नाही,? ‘एस. बी. वन’ हे पोलीस खाते यासाठी कुठे कमी पडले? याच्या चौकशा व्हायच्या त्या होतील. पण एक नवीन  ‘हत्यार’ यामुळे अशा झुंडशाहीच्या हातात  मिळालेले आहे. ते अधिक धोकादायक आहे.
परवा नांदेडमध्ये संजय बियाणी यांच्या घरासमोर आगोदरपासूनच टपून बसलेल्या मारेकऱ्यांनी ते गाडीतून उतरताच त्यांच्यावर धाड धाड गोळ्या घातल्या. त्याचा वि्हडीओ देशभर फिरतो आहे. त्यात महाराष्ट्राची बदनामी आहे. हा महाराष्ट्र असा कधीच नव्हता. िबयाणी यांना मारून आठ िदवस झाले…. मारेकरी पळाले… अजून सापडत नाहीत. गोविंद पानसरे, दाभोळकर यांच्या हत्या होवून कैक वर्षे झाली… हे सगळे जे काही चालले अाहे, ते अत्यंत घृणास्पद आहे. वृत्तपत्रांची पाने याच घटनांनी भरलेली आहेत. अग्रलेखही तेच… लोकांचे िढगभर प्रश्न पडले बाजूला… महागाईचा डोंब उसळाला अाहे. त्या प्रश्नांची चर्चा नाही… त्याच्यावर मोर्चा नाही… आंदोलन नाही… पूर्वी कडीपत्ता विकत घ्यावा लागत नव्हता… सामान्य माणसांच्या जगण्याचे सगळे प्रश्न प्रत्येक िदवशी कठीण होत चालले आहेत. २०१४ साली ‘महंगाई की पडी मार… अब की बार मोदी सरकार’ हे फलक झळकल्यावर गेल्या आठ वर्षांत  किती पट महागाई झाली? त्या वर्षीचे ५२ रुपये लिटरचे पेेट्रोल १२० रुपयांवर आले. त्यावेळी एका डॉलरची िकंमत ४२ रुपये होती. आज ती ७६ रुपये आहे. एकही वस्तू अशी नाही की, ती सामान्य माणसाला परवडू शकेल. वडापाव २० रुपये झाला… हॉटेलमधील इडली-वडा, चहा १०० रुपयांवर पोहोचला. भाज्या कडाडल्या… सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले. ४० वर्षांपूर्वी ५ रुपये रत्तल  गोडेतेल ७ रुपये रत्तल झाले तेव्हा, महिला लाटणी घेवून रस्त्यावर उतरल्या. गोडेतेलाचे घावूक व्यापारी शेठ िकलाचंद यांना त्यांच्या कार्यालयात १० तास घेराव झाला. पण त्याच्या घरावर कोणी धडकले न्ाव्हते. शांततामय मार्गानी अांदोलने होत होती. अाता रस्त्यावरची आंदोलने अराजकाच्या पद्धतीने होत आहेत. वृत्तपत्रांची भाषा अराजकीय भाषा झालेली आहे. त्यातच संपादकांना भूषण वाटत आहे. कोणी फाट्यावर मारण्याची भाषा करतो… कोणी बाप काढतोय… कुणी शिवीगाळही करतोय… महाराष्ट्राचे हे िचत्र काय आहे?
कोणत्याच राजकीय पक्षाबद्दल सहानुभूती वाटावी, असे वातावरण राहिलेले नाही. कोणाला झाकावे आिण कोणाला काढावे… पूर्वी टोळधाड यायची म्हणतात… आिण शेती फस्त करायची… आता ‘ईडी’च्या धाडी येतात… परवा श्री. शरद पवारसाहेब िदल्लीत पंतप्रधानांना भेटले. त्यांनी तक्रार केली… तक्रार काय होती? ‘श्री. संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई झाली, टाच आली याबद्दल… देशात असे काही घडते आहे, याची कल्पना देशाच्या पंतप्रधानांना नसेल का?’ त्यांच्या मान्यतेशिवाय अशी धाड घालणे िकंवा मालमत्ता जप्त करणे, हे सगळे प्रकार त्यांच्या मान्यतेिशवाय होत अाहेत का? या प्रश्नाचे उत्तरही मिळायला हवे. पवारसाहेबांनी तक्रार अशांकडे केली आहे की, तक्रार ऐकून घेताना ते मनातून हसत असतील. तक्रारीची जागाच चुकलेली आहे. आजपर्यंत जे काही देशात घडले नाही तसेच सगळे घडत अाहे. पण त्याचवेळी मनात हाही विचार येतो की, एक मराठी संपादक त्याच्या मालमत्तेवर धाड पडेल एेवढा मोठा झाला, या धाडी मुद्दाम टाकल्या जात आहेत. हे देशाला मािहती आहे. पण त्यात भूषण वाटावे, असे खरेच काही आहे का?  त्याची कायदेशीर लढाई ते लढतील. पण ती लढाई लढताना कायदेशीर मार्ग आहेत. त्यासाठी पायंड्या खाली उतरून असभ्य भाषा वापरण्याची अिजबात गरज नाही. आदळा आपट करून हा विषय संपत नाही. देशभरातच हे सत्र सुरू आहे. पण त्याला सभ्य भाषेनेच उत्तरे द्यायला हवीत. हे भान सुटत चालले तर लोकं वेगळा अर्थ काढतात. संपादकांनी आपला पेपर स्वत:साठी िकती वापरायचा… संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत. त्याचवेळी संपादकही आहेत. दोन्ही भूमिका वेगळ्या आहेत. वृत्तपत्रात त्याची सरमिसळ होता कामा नये. चार िदवसांपूर्वी तर संजय राऊत यांचा फोटो हेडलाईनमध्ये…. आिण उद्धवसाहेबांचा फोटो घडीच्या खाली…. ही पत्रकारिता माझ्यासारख्या अडाणी पत्रकाराला न समजणारी आहे.  उद्धवसाहेब, नाकापेक्षा मोती जड होवू देवू नका… निदान देशातील जे महान संपादक आहेत, त्यांना तरी हे भान असायला हवे. एकूणच महाराष्ट्रात जे काही चालले अाहे, ते महाराष्ट्राला अिभमान वाटावा, असे अिजबात नाही. काहीतरी चुकते आहे. दोन्ही बाजूंनी आपल्या भूिमका तपासून घेण्याची वेळ अाली आहे. राजकारण हा साधुसंतांचा मठ नाही, हे खरे आहे. पण, तो अराजकाचा अड्डाही  होता कामा नये. शिवाय राजकारणातील प्रत्येक घटनेकडे महाराष्ट्रातील लोक दोन डोळ्यांनी बघतात, असे समजू नका. लाखो डोळ्यांनी बघत आहेत, याचे भान ठेवा.
१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचा ६२ वा वाढिदवस आहे. १ मे १९६० चा महाराष्ट्र, त्यावेळचे नेतृत्त्व, त्यावेळचे सामािजक निर्णय, लोकांचा सहभाग, सगळेच काही आता आठवणींच्या पुस्तकात गेलेले आहे. आिण आपण भलतीकडेच िनघालेलो आहोत. ६२ वा वाढिदवस साजरा करताना याचं िचंतन होईल, याचीही गरज कोणाला पडलेली नाही. सामान्य माणसाचे कोणालाही काहीच पडलेले नाही. अशा कडेलोटाच्या टोकावर महाराष्ट्र आलेला आहे का?
– मधुकर भावे

 236 Total Likes and Views

0 Comments

No Comment.