पवार म्हणतात, मी देव मानतो

Editorial
Spread the love

राष्ट्रवादीचे सुप्रीमो ८१ वर्षे वयाचे शरद पवार यांच्याबद्दल खूप काही बोलले जाते. काही लोक म्हणतात, की पवारांच्या मनात काय ते  कोणालाही ठाऊक नसते तर काही  म्हणतात, पवार  ज्याच्यावर खुश असतात त्याचे दिवसा भरलेच समजा. पवार फारसा खुलासा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. लोकांना संभ्रमात ठेवूनच त्यांनी गेली ५५ वर्षे राजकारण केले. पण आता त्यांचीही अंडीपिल्ली  निघू लागली आहेत.   मनसेचे सुप्रीमो  राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत  डागलेल्या बाणांनी पवार अस्वस्थ  दिसले. ‘शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत. ते धर्म, देव मानत नाहीत. या पद्धतीनेच ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात़. त्यामुळे मी जातीवाद भडकवतो आणि भूमिका बदलतो, यावर पवारांनी बोलावे का, असा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत विचारला तेव्हा लगेच पवारांना पत्र परिषद बोलावून  खुलासे करावे लागले.  त्यांनी मी माझ्या देवधर्माविषयीचं प्रदर्शन कुठे करत नाही असं सांगितलं.

                 पवार म्हणाले, त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं की. मी नास्तिक आहे. मी माझ्या देवधर्माविषयीचं प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा. एकच मंदिर आहे. तिथे फोडतो. त्याचा आम्ही कुठे गाजावाजा करत नाही.  माझ्यापुढे काही आदर्श आहेत. त्या आदर्शांमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे.  त्यांनी देवधर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रचंड टीका केली आहे. त्याचा गैरफायदा घेणारा कुणी घटक असेल, तर त्याला ठोकून काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं लिखाण आम्ही लोक वाचतो, पण सगळेच वाचत असतील, कुटुंबातले लोक वाचत असतील असं नसावं. त्यामुळे अशी विधानं केली गेली असावीत.

 223 Total Likes and Views

0 Comments

No Comment.