भाजपचे मित्रपक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. जमुई जिल्ह्यामधील सिकंदरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ते भयंकर बोलले. मांझी यांनी आपल्या भाषणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. भगवान रामचंद्र काही देव नाही ते केवळ एक पात्र होतं, माझा रामावर विश्वास नाही, असं वक्तव्य मांझी यांनी केलं. त्यामुळ रामभक्तांमध्ये संताप आहे.
मांझी म्हणाले, आपण रामायण लिहिणाऱ्या वाल्मीकि आणि तुलसीदास यांना मानतो. पण राम काही देव नव्हता. वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी आपली गोष्ट सांगण्यासाठी एक पात्र बनवलं, ते रामाचं होतं. या पात्राच्या आधारे त्यांनी एक महाकाव्य रचलं. या महाकाव्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्यात. त्या गोष्टी मी मानतो, मात्र मी रामाला मानत नाही. पूजा केल्याने कोणी मोठं होतं नाही. पाठपूजा करणं अनुसूचित जातीच्या लोकांनी बंद केलं पाहिजे ते म्हणाले.
584 Total Likes and Views