आलियाने घेतले फक्त चार फेरे

Entertainment News
Spread the love

              विकी कौशल-कतरिना  तसेच  रणबीर सिंग –दीपिका पदुकोन यांच्या लग्नाचा बार मागेच उडाला. आता चर्चेतले असे एकच लग्न उरले होते आणि ते म्हणजे  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर  आणि आलिया भट्ट  यांचे.   हे लग्न नुकतेच निर्विघ्नपणे पार पडले. चार पंडितांनी मिळून मंत्रोच्चार केले. लग्नात सप्तपदीची परंपरा आहे. पण  इथे  दोघांनी वर-वधूने फक्त चार फेरे मारले आणि  आलिया कपूर घराण्याची सून झाली.  चार फेरे कसे? याचीच चर्चा होती. आलीयाचा भाऊ राहुल म्हणाले, “लग्नाला विशेष भटजी होता. कपूर घराण्याचा जुनाच  आहे.  कुठल्याही कार्याला तोच असतो. भटजीने प्रत्येक फेऱ्याचे महत्व सांगितले.  पहिला फेरा धर्मासाठी होता, दुसरा    मुलाबाळासाठी.”

            आलीयाच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीची चर्चा आहे  ती म्हणजे तिने घातलेल्या मंगलसूत्राची.    तिने खूपच नाजूक मंगळसूत्र घातलं होतं.  मंगळसुत्रातलं ‘इन्फिनिटी’चे चिन्ह  सरळ  करून पाहिले  तर  इंग्रजीतला ८ चा आकडा  दिसतो.  रणबीर हा आकडा लकी मानतो.

          सध्या ज्या  हिरोंची चलती आहे त्यात रणबीर हा एक आहे.  चार फिल्मफेअर पुरस्कार घेणाऱ्या आलियाचेही मोठे चाहते आहेत.  आलिया  ही महेश भट  यांची कन्या आहे.  रणबीर हा ३९ वर्षे वयाचा तर आलिया  २९ वर्षांची आहे.  पाच वर्षापूर्वी ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाचे शुटींग सुरु असताना दोघे जवळ आले होते. रणबीर हा  दीपिका पदुकोन आणि कतरिना यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. ब्रेकअप झाल्यावर  आलियाशी त्याचे जुळले.  आलीयाही एकेकाळी सिद्धार्थ मल्होत्रासोबत होती. ही फिल्मी दुनिया आहे.  इथे लग्नं होतात आणि मोडतातही.

                         राज कपूर हे रणबीरचे आजोबा.  राज कुठलीही गोष्ट धुमधडाक्यात करायचे.  रणबीर मात्र साधेपणात विश्वास  ठेवताना दिसतो.  सोशल मिडियावरही तो सक्रीय नसतो. हे लग्नही त्याने मुंबईत तो राहतो त्या इमारतीतील  आपल्या घरीच पार पाडले. आलियाकडून वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान, बहिणी शाहीन आणि पूजा तर भाऊ राहुल इतकेच वऱ्हाड होतं. जवळच्या नातेवाईकांमध्ये काका मुकेश आणि रॉबिन  मात्र दिसले नाहीत.

 325 Total Likes and Views

0 Comments

No Comment.