मोहाची दारू आता बनली विदेशी

Analysis Lifestyle
Spread the love

काजू आणि मोहाची फुलं यांच्यापासून बनणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याआधी या दारूला देशी दारुचा दर्जा देण्यात आला होता. मात्र जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारु आता विदेशी दारुच्या दुकानात मिळणार आहे. ठाकरे सरकार  दारूवाल्यांची किती काळजी घेते याचा हा नमुना आहे.   आता हे  दारू बनवणारे कोण असे  तुम्ही विचारले तर म्हणाल, बहुत बोलता है. चंद्रपूरची दारूबंदी हटवली. आणि आता हा निर्णय. कुठे आहेत गांधीवादी?

             मोहाला न्याय मिळाला याचा आनंदच आहे. पण लोकांच्या  या पेक्षा ज्वलंत प्रश्नानावर निर्णय का होत नाहीत?मोहफुलांच्या दारुला विदेशी मद्याचा दर्जा, स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोला मंजुरी तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय यांसह इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

             मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची इलाईट आणि सुपर प्रिमियम अशा दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे जी छोटी दुकान आहेत ते दुकानदार आता दुकानाचा विस्तार करून मद्य विक्रीची कक्षा वाढवू शकणार आहेत. इलाईट गट 600 चौरस फुटांपर्यंत विस्तार करु शकणार आहेत. तर, सुपर प्रिमियम गटातील दुकानदार 600 चौरस फुटांच्यावरदेखील विस्तार करु शकणार आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत महसूल वाढीसाठी एफएल-2 परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना त्यांच्या दुकानाचा विस्तार करुन मद्यविक्रीची कक्षा वाढवता येणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत होईल.  याशिवाय फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन आणि त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठीही धोरण आखण्यात आले आहे.

 816 Total Likes and Views

0 Comments

No Comment.