बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेस इंदूर येथून अटक करण्यात आली आहे.
मुंडे यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागीतल्याची आणि ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली होती. दीड-दोन वर्षांपासून त्यांना हा त्रास सुरू होता.
गेल्या वर्षी रेणूने धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती. पुढे काही दिवसातच तिने तक्रार माघारी घेतली होती. पण ती परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती, ‘मंत्रीपद वाचवायचं असेल तर, दहा कोटी कोणती मोठी गोष्ट आहे?’ अशा आशयाचा मेसेज ही महिला पाठवते. पाच कोटी रुपये कॅश आणि पाच कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी करते असे मुंडे यांनी तक्रारीत म्हटलं होतं.
रेणू शर्मा ही मुळची इंदूरची आहे. ती करुणा शर्माची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई व इंदूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. आता तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
320 Total Likes and Views