ऑफलाईन पद्धतीनेच जुलैमध्ये विद्यापीठ परीक्षा

Analysis
Spread the love

१ जून ते १५ जुलैदरम्यान विद्यापीठांकडून परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठांकडून करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली होती.

         बैठकीनंतर सामंत यांनी ट्विटद्वारे माहिती देताना सांगितले, की ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर असणार आहे, परीक्षा मेमध्ये न घेता १ जून ते १५ जुलैपर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे  असेही सामंत म्हणाले.

 648 Total Likes and Views

0 Comments

No Comment.