महाविकास आघाडीतील मंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायालयाने दिले आहेत. यासाठी वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्ज मंजूर करुन न्यायालयाने सिटी कोतवाली पोलिसांना कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अकोला जिल्हा परिषदेने जिल्हा जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करुन बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाख निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.
जिल्हाधिकारी नमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे पालकमंत्री कडू यांच्या गुन्हा दाखल करावेत अशी मागणी वंचित केली होती. याबाबत वंचितने प्रथमश्रेणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो मंजूर करित न्यायालयाने सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
365 Total Likes and Views