गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती

Editorial
Spread the love

राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून देशातील करोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीबाबत टोपे यांनी मिडीयाला माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असून, या बैठकीनंतर कदाचित या संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असे टोपे  म्हणाले.

              टोपे म्हणाले, आज आपण २५ हजारांपर्यंत दररोज तपासण्या करत आहोत. ही २५ हजारांची तपासणी आम्ही निश्चितपणे वाढवू. महाराष्ट्र हे तसं जर पाहिलं तर खूप सुरक्षित झोनमध्ये आहे. चिंता करण्याची परिस्थिती अजिबात नाही आणि घाबरण्याचं देखील काही कारण नाही. याचं कारण म्हणजे ९२९ आज अॅक्टीव्ह केसेस आहेत, महाराष्ट्राने एका एका दिवशी ६५ ते ७० हजार केसेस बघितलेल्या आहेत. त्यामुळे एकंदर पर मिलियनमध्ये आपण खूप खाली आहोत. म्हणजेच दर दहा लाखांमागे महाराष्ट्रात सात केसेस आहेत. त्यामुळे आज असा एकदम काळजी सारखा नक्कीच विषय नाही.

        टोपे पुढे म्हणाले,  आपल्या देशात तरी ओमायक्रॉनच सर्वदूर आहे. जरी त्याचे काही व्हेरिएंट्स जरी असले तरी, ते ओमायक्रॉनचेच खऱ्या अर्थाने भाग आहेत. म्हणून तसा काही वेगळा व्हेरिएंट निर्माण झालाय, असा काही भाग नाही. परंतु तरी देखील जिनोमिक सिक्वेन्सिंग करायला सांगितलं आहे, ते देखील आम्ही करू.” अशीही माहिती टोपेंनी दिली. केंद्राकडून नियमावली येताच लहान मुलांचे लासिकारंही  सुरु केले जाईल असे ते म्हणाले.

 274 Total Likes and Views

0 Comments

No Comment.