गेल्या १० दिवसापासून सूर्य आग ओकत आहे. या आधी सूर्य एवढा कधीही कोपला नव्हता. महाराष्ट्रात आतापर्यंत २५ जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे. गेल्या सहा वर्षांमधील सर्वाधिक आकडेवारी आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये वाढत्या उन्हाचा त्रास झाल्यानं ३७४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उन्हाळा संपायला अजून दोन महिने आहेत. असेच उष्णतामान राहिले तर अवघड आहे.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात ४० ते ४६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील उष्माघाताचे सर्वाधिक मृत्यू विदर्भात झाले आहेत. विदर्भात १५, मराठवाड्यात ६ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात ११ बळी गेले आहेत. चंद्रपूर हे जगातील पाच सर्वात उष्ण शहरांच्या होत यादीत आले आहे. अकोला जिल्ह्यात ३ आणि अमरावतीमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात २ , औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नागपूर विभागात सर्वाधिक २९५ जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता. दोन महिन्यात उष्णतामान आणखी वाढू शकते.
महाराष्ट्रातली ही परिस्थिती देशात सर्वत्र आहे. थंड हवेची ठिकाणेही होत चेंबर बनली आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्र शासीत प्रदेशांना याविषयी एक पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सूचना दिल्या आहेत. सरकार त्यांच्या परीने करायचे ते करीलच. पण प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे जरुरी झाले आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच बाहेर पद असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
441 Total Likes and Views