राहुल गांधींचा तो व्हिडीओ व्हायरल

Editorial
Spread the love

कॉन्ग्रेस नेते राहुल गांधी  गंभीर नाहीत असे  त्यांचे विरोधक नेहमी बोलत असतात.  विदेश दौरे, पार्ट्या यामध्ये ते मश्गुल असतात. त्याची प्रचिती नुकतीच आली. राहुल नेमके कुठे गेले हे पक्षाच्या नेत्यांनाही ठाऊक नसताना अचानक त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. तो कुठला यावरून बरेच काही बोलले जात आहे.  हा व्हिडीओ एका पार्टीमधला असून त्यावरून  त्यांना ट्रोल केले जात आहे. “मुंबईला वेठीस धरलं जात असताना राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. जेव्हा त्यांच्या पक्षात अनेक स्फोट होत आहेत तेव्हा ते नाईट क्लबमध्ये आहेत”, अशा शब्दांत भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केल्याने  चर्चा रंगली.

                 मालवीय यांनी ट्वीट केलेल्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी त्यांच्या एका  मैत्रीणीसोबत दिसत आहेत. प्रथमदर्शनी हा व्हिडीओ एका नाईटक्लबमधील असावा असा अंदाज वर्तवण्यात येत होता.  मात्र, त्यानंतर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या खुलाशानुसार हा व्हिडीओ राहुल गांधींच्या एका मैत्रीणीच्या लग्न समारंभातला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी मिडीयाला सांगितले, की राहुल गांधी नेपाळला त्यांच्या एका पत्रकार मैत्रिणीच्या लग्नासाठी  गेले होते.  हा काही गुन्हा नाही. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा लवकरच मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या लग्नाला हजेरी लावणं हा देखील गुन्हा ठरवतील.

 201 Total Likes and Views

0 Comments

No Comment.