भोंग्यांविरोधात पुकारलेल्या सध्या चर्चेत असलेले मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे महिन्यापूर्वी आजोबा झाले. त्यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आज पार पडला. राज ठाकरे यांच्याभोवती असलेले वलय पाहता त्यांच्या नातवाच्या नावाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये होती. अलीकडे आई-वडिलांच्या नावांची आद्याक्षरं घेऊन नाव ठेवण्याचा ट्रेंड आहे. ठाकरे घराणेही त्या मार्गाने गेल्याचे दिसते. नातवाचे नाव ठेवलं आहे ‘किआन.’ हे नाव नवे असल्याने नावाचा अर्थ काय? अर्थ शोधणे सुरु झाले. सोशल मिडिया अलर्ट झाला. देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असे अनेक अर्थ किआन ह्या नावाचे निघतात.
घरात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. ‘आता तुझे राजकीय कार्यक्रम तूच पाहा, मी संपूर्ण वेळ नातवासोबत घालवणार आहे, असं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. राज यांचे पुत्र अमित यांचा विवाह मिताली बोरूडे हिच्याशी ३ वर्षापूर्वी झाला होता. मिताली या फॅशन डिझायनर आहेत.
434 Total Likes and Views