करोनाने भारतात किती मेले? सरकार म्हणते, ५ लाख तर ‘हू’ म्हणते ४७ लाख

Analysis
Spread the love

            करोना भारतात मेल्यात  जमा आहे. थोडीशी धुगधुगी आहे. मरणारे मेले. पण किती मेले? त्यावरून   आता   वाद सुरु आहे.  ‘हू’ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा नुकताच एक अहवाल आला आहे. त्यात   दोन वर्षात  जगात   दीड कोटी लोकांचा करोनामुळे  किंवा करोनाशी संबंधित गोष्टींमुळे  मृत्यू झाला  असे म्हटले आहे. ‘हू’च्या अहवालानुसार,  दोन वर्षात  भारतामध्ये  ३३ ते ६५ लाखापर्यंत  बळी  गेले आहेत.  भारताला हा आकडा मान्य नाही.  अतिरिक्त मृत्यू दाखवण्याच्या  ‘हु’च्या पद्धतीवरच भारत  सरकारने   प्रश्नचिन्ह लावले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोणतीही अधिकृत माहिती न घेता अंदाज जारी केला असे भारत सरकारचे म्हणणे आहे. ,भारताच्या आकडेवारीनुसार, ४ लाख ८१ हजार  नागरिकांचा करोनामुळे  मृत्यू झाला.

            जागतिक आरोग्य संघटनेने करोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत भारतात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ही आकडेवारी भारत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीच्या दहापट असून जागतिक मृतांच्या आकडेवारीच्या एक तृतीयांश आहे. जगभरात अधिकृतपणे नोंदवल्या गेलेल्या मृतांची संख्या एकूण अंदाजे १४.९ दशलक्ष आहे.

 614 Total Likes and Views

0 Comments

No Comment.