“नवनीत राणा को जेल पसंत है” असे दिसते. कारण १४ दिवसाचा तुरुंगवास आणि नंतर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन बाहेर आल्या आल्या त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं. “दम असेल तर लोकांमधून निवडून येऊन दाखवा,” असं नवनीत राणा म्हणाल्या. “उद्धव ठाकरे जेथून उभे राहतील तेथे मी उभी राहून जिंकून दाखवीन’ अशा त्या कडाडल्या. “मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल. शिवसेनेने मुंबई पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची लंका तयार केलीय. ती लंका आम्ही नष्ट करू,” अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला आव्हान दिलं.
नवनीत राणा अमरावतीच्या पक्ष खासदार आहेत. रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत म्हणून संतप्त आहेत. ही ‘जखमी वाघीण’ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण भेटणार आहोत असे त्यांनी जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांना त्या सोडणार नाहीत. त्या किती दम लावतात ते दिसेलच. पण सध्या मात्र उद्धव यांच्याशी पंगा घेऊन त्यांनीच ‘आ बैल, मुझे मार’ असे केले आहे का? मामला तसाच आहे. उद्धव यांच्या ‘मातोश्री’ ह्या घरापुढे त्या हनुमान चालिसा वाचायचा हट्ट त्या धरून होत्या. त्यावरून पोलिसांनी त्यांना उचलले आणि राजद्रोहाचे कलम लावले. कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका करताना काही अटी घातल्या. त्यात मीडियाशी बोलायचे नाही ही एक आहे. त्या अटीचा त्यांनी भंग केला असे शिवसेना आता म्हणत आहे. कोर्टाने ते मान्य केले तर नवनीत यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागू शकते. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, राणा ज्या बोलल्या ती त्यांची खाज आहे. खाजेवर आमच्याकडे औषध आहे. एकूण काय , तर ही वादावादी सुरूच राहील.
173 Total Likes and Views