सत्ता ही नशा आहे. उतरता उतरत नाही. सत्ता माणसाला म्हातारा होऊ देत नाही. आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचेच उदाहरण घ्या. पुतीन ७० वर्षे वयाचे आहेत. त्यांची ३८ वर्षे वयाची मैत्रीण अलीना कबाएवा हिला त्यांच्यापासून दिवस गेले आहेत. पुतीन यांच्यासाठी मात्र ही गुड न्यूज नाही. त्यांना अलीना हिच्यापासून दोन मुले आहेत. त्यांना आणखी मुल नको होतं, मात्र, अलीना हिला दिवस गेल्याची बातमी कळताच त्यांना धक्का बसला. त्याचे कारणही तसेच आहे.
पुतीन यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे. पण पुतीन यांनी अद्याप अलीना कबाएवा हिला लग्नाची बायको म्हणून स्वीकारलेले नाही. त्याचे टेन्शन त्यांना आहेच. यूक्रेनशी युद्धाचे टेन्शन वेगळे. युक्रेनशी युद्धाला अडीच महिने पूर्ण होत आले आहेत. रशियानं यूक्रेनच्या नाटोतील सहभागाच्या मुद्यावरुन लष्करी कारवाईला सुरुवात केली होती. युक्रेन झटपट पडेल आणि त्यांची राजधानी कीव लवकर ताब्यात येईल, अशी पुतीन यांना आशा होती. मात्र, पत्ते उलटे पडले. रशियाचं ह्या युद्धात मोठं नुकसान झालं आहे आणि युक्रेन अजून हार मानायला तयार नाही. त्या तणावात बाप होत असल्याचा आनंदही ते लुटू शकत नाहीत. रशियामध्ये ह्या बातमीची खमंग चर्चा आहे.
267 Total Likes and Views