हनुमानाने लंका पेटवली होती. पण आताची जळती लंका तिथल्या लोकांनीच पेटवली आहे. भीषण आर्थिक संकटाने त्रस्त लोक सरकारविरोधात रस्त्यावर येऊन जाळपोळ करीत आहेत. सत्ताधाऱ्यांचे पुतळे तोडून पाडले जात आहेत. महिंद्र राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. काही तासांतच ७६ वर्षांचे राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. या हल्ल्यानंतर राजपक्षे समर्थक नेत्यांविरुद्ध व्यापक हिंसाचाराला तोंड फुटलं आहे. ८ लोक मारले गेले आहेत. जमावाने महिंद्र राजपक्षे यांचे घर जाळले. नेत्यांच्या कार पेटवून दिल्या जात आहेत. एका खासदाराची हत्या झाल्याची बातमी आहे. महिंद्र जीवाच्या भीतीने पळून गेले. ते कुठे आहेत कोणाला माहित नाही. यामुळे अधिकाऱ्यांना देशव्यापी संचारबंदी लागू करणं आणि राजधानी कोलंबोत लष्करी तुकडय़ा तैनात करणं भाग पडलं. लष्कराने हिंसा करणाऱ्यांना दिसताच गोळी घालण्याचा आदेश दिला आहे.
लोकांचा रोष राजपक्षे परिवारावर आहे. ह्या परिवाराने लंकेचा सत्यानाश केला असेल लोक मानतात. चुकीच्या धोरणाने लंका कर्जाच्या जाळ्यात सापडला आहे. कर्जाचे व्याज द्यायलाही सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे आयात ठप्प आहे. बाहेरून माल येत नसल्याने महागाई वाढली आहे.
चित्रपट दिग्दर्शक कमाल खानने मंगळवारी रात्री ट्वीट करत श्रीलंका आणि भारताची तुलना केली आहे. पुढे जाऊन हे सर्व भारतातही होणार आहे असं कमाल खानन त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. श्रीलंकेत लष्कराला शूट ऑन साईटचा आदेश देण्यात आला आहे. याचा अर्थ श्रीलंका आपल्या लोकांना मारत आहे. हा श्रीलंकेतील हिंदू-मुस्लीम राजकारणाचा परिणाम आहे. आता हिंदू, मुस्लीम कोणीही सरकारसाठी मौल्यवान नाही. भारतीयांकडे अद्यापही श्रीलंकेकडून शिकण्यासाठी वेळ आहे. हे राजकीय नेते कोणाचेच नाहीत असे ते म्हणतात. पण अनेकांनी त्यांच्या मताशी अशांती दर्शवली आहे. एकाने म्हटलं आहे की, आपल्याला फक्त श्रीलंकेकडूनच शिकायचं आहे का? बांगलादेश, पाकिस्तानकडून आपण शिकत नाही का जिथे अल्पसंख्याकांना संपवण्यात आलं आहे. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा ते २५ टक्के होते आणि आता ०.१ टक्के आहेत.
192 Total Likes and Views