ताजमहालच्या त्या २२ बंद खोल्यांमध्ये दडले काय?

Analysis
Spread the love

हल्ली मशिदींचा वाद  जोरात आहे. मंदिरे पडून  मशिदी बांधण्यात आल्या असा एकूण सूर आहे.  वाराणशीच्या  ज्ञानवापी मशिदीचा  वाद   गरम असताना आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल  वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ताजमहाल ही प्रेमाची निशाणी मानली जाते. मोगल राजा शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. १६३२ सालचे हे संगमरव्री दगडाचे बांधकाम जगातले सातवे आश्चर्य मानले जाते.  वाद ताजमहालचा तर आहेच. पण त्या खाली असलेल्या २२ बंद खोल्यांचाही आहे.

                   इतिहासकार पीएन ओक यांच्या एका  पुस्तकावरून ताजमहालचा वाद सुरू झाला. या पुस्तकात ताजमहाल हे शिवमंदिर असल्याबाबत दावा करण्यात आला आहे. काही इतिहासकारांच्या  मते, ताजमहालमध्ये मुख्य समाधी आणि चमेलीच्या मजल्याखाली २२ खोल्या आहेत, ज्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यावर लोखंडी जाळी लावून ते बंद करण्यात आले आहेत. सुमारे ४५ वर्षांपूर्वीपर्यंत पायऱ्या उतरून जाण्याचा मार्ग खुला होता. या २२ खोल्या उघडण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र  ‘अभ्यास  करून या’ ह्या शब्दात लखनो  हायकोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले. कोर्ट थेट  म्हणाले, बंद खोल्याबाबत  विचारणारे तुम्ही कोण?  हायकोर्टाने सांगितले की, “जर त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खोल्या बंद असल्याचे सांगितले असेल तर ती माहिती आहे, यामुळे तुमचे समाधान होत नसेल तर आव्हान द्या. कोणत्याही विद्यापीठाने तुम्हाला अशा विषयावर संशोधन करण्यास मनाई केल्यास आमच्याकडे या.”

                      तथापि, ज्ञानव्यापी मशिदीचा मात्र सर्व्हे होणार आहे. मशिद आणि श्रृंगार गौरी मंदिर प्रकरणी  जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्ट कमिश्नर हटवण्याची मुस्लिम पक्षकारांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत आणखी दोन अतिरिक्त वकिलांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर कोर्टाने मशिदी परिसराचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत मशिदीच्या आयोगाची कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व्हे सुरुच राहणार आहे.
मुस्लिम याचिकाकर्त्यांना हा  मोठा झटका  आहे. मुस्लिमांचा सर्व्हेला विरोध होता.


 481 Total Likes and Views

0 Comments

No Comment.