औरंगजेबाच्या कबरीची पूजा होऊ शकते?

Analysis
Spread the love

             एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी  खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले, यावरून राजकारण  तापले आहे.  खरेच औरन्जेबच्य कबरीची आपल्या देशात पूजा होऊ शकते काय? असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. भाजपच नव्हे तर इतरही पक्षाच्या नेत्यांनी ह्यावरून सडकून टीका केली आहे.

                     विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगजेब या देशात हिंदूंचा तर नाहीच पण मुस्लिमांचाही नेता होवू शकत नाही. कारण, या देशावर त्याने आक्रमण केलं होतं. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची छळ करून हत्या केली, अशा औरंगजेबाचं कोणी महिमामंडन करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींवर कारवाई करणारे, लीलावतीतील एखादा फोटो ट्वीट झाला तर त्यावर कारवाई करणारे आता का गप्प आहेत? असा सवालही त्यांनी केला. उद्धव ठाकरे ज्या लोकांसोबत बसले आहेत, त्यांचीच नीती ते चालवत आहेत.” असं ते म्हणाले.

                 शिवसेना नेते संजय राऊत कडाडून म्हणाले,  “संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण कऱण्याचं ओवेसी बंधूंचं राजकारण दिसत आहे. पण मी इतकंच सांगेन की औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकलं आहे.

     ज्या  औरंगजेबाने संभाजी राजेंना हाल हाल करून मारले  त्याच्या कबरीवर जाऊन ओवेसींना नेमका काय संदेश द्यायचा आहे? असा सवाल करत  राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ओवेसींवर तुटून पडले.

 729 Total Likes and Views

0 Comments

No Comment.