करोनाची दहशत संपली. मात्र केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या प्रकारच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. पाच वर्षांखालील मुलांना होणाऱ्या या संसर्गाचे नेमके कारण डॉक्टरांनाही सापडलेले नाही. ह्या संसर्गाचे बारसे डॉक्टरांनी ‘टोमॅटो फ्लू’ असे केले आहे. या फ्लूने संसर्गित झालेल्या मुलांमध्ये कोणतेही निदान न झालेला ताप दिसून येतो. शरीराच्या अनेक भागात लाल आकाराचे फोड येतात. डॉक्टरांनी अशा मुलांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग सध्या फक्त केरळमधील कोल्लम शहरात दिसत आहे. तो पसरणार नाही याचा भरवसा नाही. त्यामुळे पालकांनी गाफील राहता कामा नये. थोडीही श्नाका आल्यास डॉक्टरांना दाखवावे. थोडक्यात काय, तर करोना आपल्याकडे कायमचा पाहुणा म्हणून आला आहे. त्याची रूपं वेगळी असतील. पण तो एक आहे. त्यामुळे काळजी घ्या.
323 Total Likes and Views