सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची चर्चा

News
Spread the love

              सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ करण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत असल्याची पक्की खबर आहे. मूळ पगारात वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार आठ हजार रुपयांनी वाढणार आहे. मात्र  केंद्र सरकारने अजून याविषयी अधिकृत घोषणा केली नाही.

                  केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर सध्या 2.57 टक्के आहे तर मूळ पगार  18 हजार रुपये  आहे.  फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18 हजारांहून 26 हजारांवर पोहोचणार आहे.

                  पाच वर्षापूर्वी सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 7 हजारांनी वाढवण्यात आला होता. सर्वोच्च स्तरावरील म्हणजेच सचिवांचा पगार 90 हजार रुपयांवरून अडीच लाख रुपये करण्यात आला होता. दरम्यान 7 व्या वेतन आयोगामध्ये बनवलेले वेतन मॅट्रिक्स हे फिटमेंट घटकावर आधारित आहे. एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८ हजार रुपये असेल, तर भत्ते वगळता त्याचा पगार १८०००X २.५७  म्हणजे  ४६२६० रुपये  असेल. फिटमेंट फॅक्टर जर 3.68 वर गेला मोठी पगारवाढ आहे. अर्थात सरकारने मान्य केले तरच.

 200 Total Likes and Views

0 Comments

No Comment.