कंगनाचा ‘धाकड’ आपटला

Entertainment
Spread the love

कंगना राणावत ही गुणी  नटी आहे.  तिने काही सुपरहिट सिनेमे दिले. पण अलीकडे तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटत आहेत.  ओळीने तिचे आठ चित्रपट फ्लॉप झाले आणि आता ताजा ‘धाकड’ही पहिल्या दिवशी  फारशी कमाई करू शकला नाही. कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. २० मे रोजी  ‘धाकड’ देशभरात जवळपास २२०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण  फ्लॉप गेला. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई फक्त  १ कोटी २० लाख रुपये इतपत झाली. सकाळी ‘धाकड’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये फारशी गर्दी देखील नव्हती. कंगनाच्या इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन फारच कमी होतं. कंगनाने या चित्रपटाचं प्रमोशनही अगदी जीव ओतून केलं. देशभरात देवदर्शन करत तिने ‘धाकड’चं प्रमोशन केलं. जवळपास ८० कोटी रुपये बजेट असलेल्या या  चित्रपटासाठी कंगनाने २० कोटी रुपये मानधन घेतलं अशी माहिती आहे. दे दणादण छापाचा  असलेला हा चित्रपट उत्तम कमाई करणार असे अंदाज वर्तवले जात होते. सारे कोसळले. याउलट ‘धाकड’ सोबतच लागलेल्या  कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या २’ चित्रपटाने दमदार कमाई केली. या चित्रपटाची पहिल्याच दिवसाची कमाई १३ कोटी  रुपये होती. अर्थात पहिला दिवस फसला म्हणजे सारेच फासले असे नाही. हा आठवडा ‘धाकड’ किती गर्दी खेचतो त्यावरच  नेमके मत देता येईल.

 212 Total Likes and Views

0 Comments

No Comment.