हार्टब्रेक? राखीचा

Entertainment News
Spread the love

ड्रामा क्वीन राखी सावंत तशी नेहमीच चर्चेत असते. पण  आता ती  खास चर्चेत आहे.  रितेशपासून  वेगळी झाल्यानंतर  राखी पुन्हा एकाच्या रिलेशनशिपमध्ये आहे.  ह्या वीरपुरुषाचे नाव आहे   आदिल दुर्राणी.    आदिल  हा मोठा व्यापारी आहे. पण  वयाने राखीपेक्षा   ६ वर्षाने लहान आहे.    सुरुवातीला   आदिलच्या घरचे  ह्या संबंधाला तयार नव्हते. पण आता राजी झाले असे म्हणतात. राखीने तर आपल्या साखरपुड्याचा व्हिडीओ टाकून  सर्वांना चकवले आहे. ‘हा पब्लिसिटी स्टंट  नाही’ असे राखी म्हणते.    सारे कसे  व्यवस्थित  जुळून आले तर लवकरच लग्नही पार पडेल.  आदिल हा कार व्यापारी आहे.  राखी म्हणते, रितेशशी फाटल्यानन्तर मी डिप्रेशनमध्ये होते.   आदिलनेच मला त्यातून बाहेर काढले.  भेटीनन्तर महिनाभरातच त्याने मला प्रपोज केले.  मी तयार नव्हते. त्यानेच  तयार केले.

              राखीची ही प्रेम कथा अशीच रंगत जावो. पण आता आता अशी माहिती समजली, की  गडबड आहे. म्हैसुरहून राखीला एका तरुणीचा फोन आला.  राखी जिच्यासोबत आहे त्याच्यासोबत आपण गेल्या चार वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहोत असे ह्या तरुणीचे म्हणणे आहे.  आता बोला. आला ना लव्ह स्टोरीत ट्वीस्ट.  म्हणजे राखीचा पुन्हा हार्ट ब्रेक असे मानायचे का? देव करो, राखीच्या संसाराला कुणाची दृष्ट ना लागो.

 191 Total Likes and Views

0 Comments

No Comment.