हसना मना है

Jokes News
Spread the love

१)
पुण्यातील एक गृहस्थ भाजीवालीला म्हणतो,
लिंबू कितीला?
ती म्हणते, १० रुपयाला एक….
पुणेकर म्हणतो, थांबा.
घरातून पोह्याची प्लेट आणतो आणि म्हणतो,
दोन रुपयाचं पिळून द्याल का?

२)
प्रेमात पैशाला महत्व असतंच.
उगाच नाय काय मुलींच्या स्वप्नात राजकुमार येतो…
.कधी कामगार आला का?

३)
गण्या- मुलीकडचे फार श्रीमंत दिसतात.
मन्या- कशावरून?
गण्या- कांदापोह्याच्या प्लेटमध्ये लिंबाची फोडसुद्धा होती.

४)
मुलगी-तुझं सोर्स ऑफ इन्कम काय?
मुलगा- मी तबला वाजवतो.
मुलगी-कधी पाहिला नाही तुला वाजवताना.
मुलगा- वाजवू नको म्हणून कॉलनीतले लोक मला दरमहा २० हजार रुपये देतात.
मुलगी- आपण लग्न करूया. मी गाणं म्हणेन. गाणं म्हणू नये म्हणून आणखी २० हजार रुपये कमवीन. मुले झाली की त्यांना वेगवेगळी वाद्ये शिकवीन…..

५)
सूर्याला पण बायको असती तर बरं झालं असतं…
.कंट्रोलमध्ये राहिला असता. लय तापता राव.

६)
नवरा बायको प्रवास करीत होते.
गाडीजवळ एक भिकारी आला.
त्याला पाहून नवरा खिशातले पाकीट काढू लागला. इतक्यात भिकारी बोलला,
तुमची जोडी सात जन्म अशीच राहू दे…….
नवऱ्याने बाहेर काढलेले पाकीट परत खिशात ठेवून दिले.
आणि म्हणाला, बस बोंबलत…
भिकारी पुण्याचा होता. म्हणाला, हा जन्म सातवा ठरू दे.
मग काय विचारता. नवऱ्याने पूर्ण पाकीट भिकाऱ्याच्या हातात दिले.

७)
रविवारी दुपारचा चहा झाल्यावर पत्नी ५-६ गोळ्या आणि पाणी घेऊन पतीजवळ जाते. पती म्हणतो, एवढ्या गोळ्या कशासाठी?
पत्नी म्हणते, तुमचे हातपाय दुखताहेत ना. घ्या गोळ्या.
नवरा म्हणतो, मला काहीही झाले नाही. मी एकदम फिट आहे.
पत्नी म्हणते, मग चला शॉपिंगला.

८)
पार्टी पहाटेपर्यंत चालली.
सोबत लंगोटी दोस्त होते. मग काय विचारता.
सात पेग होऊनही मी कार चालवू शकत होतो.
पण उगाच धोका कशाला पत्करता ह्या विचाराने मी ओला मागवली. ओलाने गेलो.
दुसऱ्या दिवशी सर्वांनी माझे खूप कौतुक केले. ३०० लाईक आणि ५० कॉमेंट आल्या.
त्यातली एक कॉमेंट भारी होती. तीत म्हटले होते, भाऊ, तू ओलाने गेला कुठे? पार्टी तर तुझ्याच घरी होती.

९)
होळीचा दिवस. मी अगदी जुन्यातले जुने कपडे घालायला घेतले. त्यावर बायको म्हणाले,
इतकेही जुने कपडे घालू नका. कोणी रंग लावण्याऐवजी घरातून भाकर आणून वाढेल.
आणि हो, सोबत आधार कार्ड ठेवा. परतल्यावर दाखवा. गेल्या वर्षी भलत्याच माणसाला आंघोळ घातली होती मी.

१०)
नागपूरकर- जर का तुम्हाला देव भेटला तर तुम्ही काय कराल?
पुणेकर- आधी मला हे बघावे लागेल, की तो माझ्या घरी आला आहे की मी त्याच्या घरी गेलो आहे.

 337 Total Likes and Views

0 Comments

No Comment.