पदवीदान दीक्षांत सोहळा यापुढे मराठमोळ्या पद्धतीने

Editorial
Spread the love

इंग्रजांनी लावलेली दीक्षांतची पध्दती बंद करून पुढील वर्षांपासून मराठमोळा पदवीदान दीक्षांत सोहळा होईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.  नागपूर शासकीय तंत्रनिकेतनच्या पदवीदान सोहळ्यात सामंत  बोलत होते.

            सामंत म्हणाले, दीक्षांत सोहळा हा कार्यक्रम उत्साहाचा असायला हवा. तरुणांच्या कलाने कार्यक्रम हवा. तुमचा वेतन आयोग माझ्या दृष्टीने गौण आहे. विद्यार्थी महत्वाचा आहे.  त्यांना काय हवे याचा विचार होणार की नाही?  त्यामुळे दीक्षांतची ही प्रथा बदलायला हवी. यापुढे दीक्षांत सोहळे मराठमोळ्या पद्धतीने होतील.

                 दीक्षांत सोहळ्याचा वेळ कमी करा. एमबीएसारखा एंर्जेंटिक कार्यक्रम हवा, इंग्रज गेले आता आपण आपली प्रथा सुरू करू. दीक्षांत मिरवणूक विद्यार्थ्यांची हवी. किती लांब कार्यक्रम असतो दीक्षांत. अनेकांना झोपा येतात. विद्यार्थ्यांचे कार्यक्रम त्यांच्यासाठी असायला हवे. पदवीदान कार्यक्रमात इतकी भयाण शांतता बरी वाटत नाही.

         ऑनलाइनच्या मानसिकतेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढावे लागेल असे आवाहनही सामंत यांनी केले.

 259 Total Likes and Views

0 Comments

No Comment.