करोना गेला. सध्या मंकीपॉक्स या आजाराची मोठी चर्चा सुरू झाली आहे. कांजिण्या किंवा देवीप्रमाणेच मंकीपॉक्समुळे देखील अंगावर पुरळ उठतं. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ब्रिटन आणि अमेरिका ह्या देशातदेखील ह्या आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आपल्या देशातही काहीसं चिंतेचं वातावरण आहे. मात्र काळजीचे कारण नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आपल्या देशात एकही मंकीपॉक्सची केस आढळली नाही असे ते म्हणाले.
टोपे म्हणाले, “हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत. साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. एक ते दोन दिवस पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण न आढळल्याने घाबरण्याचं कारण नसल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. “माझं स्पष्ट सांगणं आहे की काळजी करण्याचं कारण नाही. एकही केस भारतात आढळलेली नाही. प्रादुर्भाव असलेल्या देशातून आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं विमानतळावर स्क्रिनिंग केलं जातं.
240 Total Likes and Views