दोन हजाराची नोट गेली कुठे?

Analysis
Spread the love

सहा वर्षापूर्वी नोटाबंदीची घोषणा झाली.  रिझर्व्ह बँकेनं २००० रुपये किमतीची नवीन नोट चलनात आणली होती. पण अलीकडे  अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा दिसत नाहीत. आता तर खुद्द  त्या  गायब झाल्याचं निरीक्षण नुकतंच आरबीआयने नोंदवलं आहे. रिझर्व्ह बँकच्या , मार्च २०२२ च्या संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटात १२.६० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या बाजारात २ हजार रुपयांच्या २१ हजार ४२० लाख नोटा आहेत. गेल्या वर्षी हा आकडा २४ हजार ५१० लाख इतका होता. तर २०२० मध्ये अर्थव्यवस्थेत २७ हजार ३९८ लाख २ हजार रुपयांच्या नोटा होत्या. गेल्या दोन वर्षांत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत २१.८१ टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे आरबीआयने गेल्या चार वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन  नोटा छापल्याच नाहीत.

   मग गेल्या कुठे?  एटीएममध्येही  ह्या नोटा निघत नाहीत. याचा अर्थ  ह्या नोटा कुणीतरी साठवून ठेवत आहे. चक्क साठेबाजी.  ह्या दोन वर्षात खूप निवडणुका झाल्या. निवडणुका म्हटल्या तर मोठ्या नोटा लागतातच.  त्याचाही हा परिणाम असेल.  मोठ्या रकमेच्या नोटांचा  गैरवापर होतो  म्हणून नोटाबंदी आणली गेली. पण काही उपयोग झालेला दिसत नाही.  त्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटेवर   लोकांना गाडी ध्क्वावी  लागत आहे.  कोणीही खासदार  किंवा कुणी नेता  या प्रश्नावर बोलायला तयार नाही.  निर्मला सीतारमण याही गप्प आहेत.  मंदिर-मशीदमध्ये  राजकारणी बिझी आहेत.  लोकांच्या प्रश्नांवर विचार करायला कोणाला वेळ आहे?  मोदींनाच विचारतो. …दोन हजाराच्या नोटेचे आम्हाला दर्शन केव्हा होईल?

 809 Total Likes and Views

0 Comments

No Comment.