तो गेला असे आपण समजत होतो. पण तो गेलेला नाही. दबून बसला आहे. काळजी घ्या. आलमारीत ठेवलेले मास्क बाहेर काढा आणि घालून राहा. करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचा नवा अवतार असलेले बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने चिंता वाढली आहे. या प्रकारांचे सात रुग्ण पुणे शहरात सापडल्याने दक्षता घेण्यात येत आहे. ह्या सर्वांनी लस टोचून घेतली असूनही हल्ला झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, काळजी करण्याचं, घाबरण्याचं सध्या काही कारण नाही, पण काळजी घ्यावी लागेल.
विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉन प्रकारातील असल्यामुळे सध्या तरी त्याचा फारसा धोका नाही. तसेच रुग्णसंख्या वाढत असली तरी ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेच्या तुलनेत हा वेग कमी आहे. पुढील काही दिवस रुग्णसंख्येत वाढ होत राहील, परंतु रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण कमी राहिल्यास चिंतेचे कारण नाही. या दृष्टीने या दोन्ही बाबींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.
मात्र तरीही टेन्शन आहेच. कारण बीए.४ आणि बीए.५ हे ओमायक्रॉनचे प्रकार आहेत. या प्रकारच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग लक्षणीय असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रुग्णआलेखावरून आढळले आहे.
191 Total Likes and Views