मृत्यू कधी बोलवेल याचा नेम नाही. प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके याचेच घ्या ना. जाहीर कार्यक्रमात ‘अलविद’ हे गणे गातानाच तो कोसळला. ‘केके’चं मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. केकेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची नोंद पोलिसांनी केलीय. आता केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. तो ५४ वर्षांचा होता. केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला होता. तिथेच तो कोसळला. केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्याजवळ जखमांचे निशाण दिसून आले आहेत. त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.
गुलझार यांच्या माचिस चित्रपटामधील ‘छोड आऐ हम वो गलीया’ गाणं तो गायला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. हम दिल दे चुके सनममधील ‘तडप तडप के..’ गाणंही त्याचंच होतं.
248 Total Likes and Views