दुनिया बदलते आहे. आईबाप, मुलंमुली सारं बदलतं आहे. बदलांचा हा वेग पाहिला तर माणूस थक्क होतो. जग मोठे विचित्र आहे. जगातली माणसेही विचित्र असणारच. अलीकडे इतरांपेक्षा काही वेगळे करण्याचे वेड नव्या पिढीत घुसले आहे. लग्नाचेच घ्या ना. लग्नाकडे पाहण्याचा तरुण पिढीचा दृष्टीकोन पाहिला तर आणखी ५० वर्षांनी लग्न हा विषयच नसेल. विवाह न करताच लोक एकत्र राहताना दिसतील. अलीकडे ‘रिलेशनशिप ‘ नावाचा प्रकार सुरूही झाला आहे. गुजरामधील २४ वर्षीय ह्या तरुणीचेच उदाहरण घ्या. आतापर्यंत कुणीही केले नसेल असे लग्न ही तरुणी करते आहे. तिने स्वत:सोबत लग्न करण्याचा घाट घातला आहे. क्षमा असे ह्या तरुणीचे नाव आहे. तिच्या या आगळ्यावेगळ्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. येत्या ११ तारखेचा मुहुर्त तिने काढला आहे. , शॉपिंगही झाले आहे. खासगी कंपनीत काम करणारी ही तरुणी म्हणते, , मला नवरी बनायचं होतं पण लग्न नाही करायचयं. त्यामुळे मी स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
स्वतःशीच लग्न करण्यामागचे तिचे तर्कशास्त्रही विचित्र आहे. क्षमा म्हणते, माझं स्वत:वर प्रेम आहे म्हणून मी स्वत:सोबत लग्न करणार आहे. हे लग्न म्हणजे कोणत्याही अटीशिवाय स्वत:वर कसं प्रेम करायचं याचं उदाहरण असेल. खास म्हणजे क्षमाच्या आई-वडिलांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. एका मंदिरात क्षमा स्वत:सोबतच लग्न करणार आहे. लग्नानंतर ती दोन आठवडे हनिमूनसाठी गोव्याला जाणार आहे. आहे की नाही वेड्यांचे जग.
721 Total Likes and Views