कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली आहे. ७५ वर्षे वयाच्या ‘सोनिया गांधींना बुधवारी सायंकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर कोविड चाचणीत त्या पॉझिटिव्ह आल्या. सोनिया गांधींनी सध्या स्वत:ला वेगळं केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे.’
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या, त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. ८ जूनपूर्वी सोनिया गांधी बऱ्या होतील, अशी आशा सुरजेवालांनी व्यक्त केली.
८ जून रोजी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलंय. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. याच प्रकरणात राहुल गांधी यांनाही ईडीने बोलावले आहे. राहुल सध्या विदेशात आहेत. १९ मे रोजी ते लंडनला गेले. तेव्हापासून ते बाहेर आहेत. ते येतील तेव्हा ईडीकडे जातील .
करोनाने देशात पुन्हा डोके वर काढलंय असे दिसते. एकट्या दिल्लीत ३६८ नवे पेशंट आज सापडले. २४ तासात देशात २७४५ नवे पेशंट आढळले आणि ६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एक हजार नवे पेशंट सापडले आहेत. तीन महिन्यातला हा सर्वात मोठा आकडा आहे. याचा अर्थ करोना गेलेला नाही. वेगवेगळ्या अवतारात तो वावरतो आहे. जनतेने काळजी घेतली पाहिजे. मास्क घाला, गर्दीत जाणे टाळां असे डॉक्टर पुन्हा एकदा सांगू लागले आहेत.
200 Total Likes and Views