बाहुलीला फाशी देऊन मुलाने घेतला गळफास

Hi Special News
Spread the love

मुलांना चांगले-वाईट कळत नसते. तो जे पाहतो त्याची तो नक्कल करतो. हल्ली मुलांकडे मोबाईल आल्याने आई -वडिलांपुढे नव्याच समस्या उभ्या राहिल्या आहेत. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठ वर्षांच्या मुलाने खेळण्यातील बाहुलीला फाशी दिली. बाहुलीला फाशी देण्याआधी त्याने तिच्या तोंडाला कपडा बांधला. यानंतर स्वत:च्या तोंडाला कपडा बांधून लटकवून घेतलं.
नेपाळी कुटुंबात हे घडले. मुलाचे वडील सुरक्षारक्षक आहेत. ज्या सोसायटीत हे घडले तिथे वडील सुरक्षारक्षकाचे काम पाहतात. त्यांना तीन मुलं असून हा आठ वर्षांचा मुलगा सर्वात मोठा आहे. मोबाईलमधील व्हिडीओ पाहून मुलाने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटना घडली तेव्हा मुलाची आई घरकामात होती. मुलगा घरात बाहुलीसोबत खेळत होता.त्याची आई कामात व्यग्र होती. बराच वेळ आवाज येत नसल्याने आईने पाहिले तेव्हा मुलगा खिडकीला लटकलेला होता. बाहुलीला टॉवेलने लटकवलं होतं. मुलाने घरातील कपडे वाळत घालण्याच्या दोरीने गळफास घेतला. फाशी, त्यासाठी लागणारी दोरी हे सारे त्या कोवळ्या मुलाला कुठून कळले असेल? मोबाईलवर त्याने असा प्रकार पाहिला असेल. त्याची त्याने नक्कल केली. पण त्यातला मृत्यू त्याला ठाऊक नव्हता. मोबाईल अनेक घरांसाठी शाप ठरत आहे. त्यातला हा एक प्रकार. मुलं मोबाईल हाती घेतात. पण त्यात काय पहावे याचे त्यांना ज्ञान नसते. इथेच खूप सारे नुकसान होऊन गेले असते.

 327 Total Likes and Views

0 Comments

No Comment.