करोना वाढतोय, सक्ती नाही, मात्र मास्क वापरण्याचं आवाहन

Editorial
Spread the love

राज्यात काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पण कोणत्याही प्रकारे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. मास्क वापरण्याचं केवळ  आवाहन करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. 

                 आरोग्य सचिवाने काढलेल्या पत्रकामध्ये मास्क घालणं हे ‘मस्ट’ असं म्हटलं आल्यानं राज्यात मास्कसक्ती करण्यात आल्याचा सर्वांचा समज झाला. पण हा ‘मस्ट’ शब्द सक्ती असा न वाचता केवळ मास्क वापरण्याचं आवाहन असा वाचून मीडियानं लोकांना सांगावं. त्यामुळं मास्क नसल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

                टोपे म्हणाले,  मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्यामुळे  बंद ठिकाणं जसं की बसेस, रेल्वे, शाळा, कार्यालये असतील तिथं मास्क वापरावं. खुल्या ठिकाणी त्याला शिथिलता असली तरी हरकत नाही. त्याला जोडून लसीकरण करा, बूस्टर डोस घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्यावतीनं महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

 262 Total Likes and Views

0 Comments

No Comment.