येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केली आहे. पाच जागांवर भाजपा नेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धक्कातंत्र हे ह्या यादीचे विशेष आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा पत्ता भाजपाने कट केला. यावेळी भाजपाने उमा खापरे तसंच श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने निवडणूक रंगणार आहे. पंकजा गेल्या निवडणुकीत पडल्यानंतर बाजूला पडल्या होत्या. अलीकडे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले होते. विचन परिषदेवर जायला आपण उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण पराभवानंतरच्या काळात त्यांनी केलेली आगपाखड विसरलेला नाही असेच दिसते. आता २०२४ पर्यंत वाट पाहणे पंकजा यांना भाग आहे.
निवडणुकीच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे त्यांचे ओएसडी होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
पिंपरी चिंचवडच्या विरोधी पक्षनेत्या राहिलेल्या उमा खापरे यांनी संधी देत संघटनेसाठी काम करणाऱ्या निष्ठावंताची दखल घेतली जाते, असा संदेश दिला आहे. उमा खापरे या पिंपरी चिंचवडच्या असून त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.पंकजा यांचे तिकीट कापताना मुंडे गटातल्याच एका आक्रमक महिला ओबीसी नेत्याला आणून हायकमांडने मोठी खेळी खेळली. उत्तरप्रदेश निवडणुकीनंतर उमा खापरे या चर्चेत आल्या त्या दिपाली सय्यद यांच्यावरील टीकेमुळे.
राम शिंदे गेल्या निवडणुकीत कर्जत-जामखेड इथेऊन पडले होते. पुढच्या निवडणुकीत शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना शह देण्यासाठी श्रेष्ठींनी शिंदे यांना संधी दिल्याचे मानले जाते.
252 Total Likes and Views