राज्यात नव्या शैक्षणिक वर्षांतर्गंत येत्या १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. पण करोनाचा वाढता उपद्रव पाहता शाळा पुन्हा बंद होणार की सुरु राहणार याची पालकांमध्ये चर्चा आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या विषयावर ठाम भूमिका घेतली आहे. गायकवाड यांच्या भूमिकेचे पालकांमध्ये स्वागत होत आहे. दोन वर्षात खूप नुकसान झाले. आता लोक घरी बसायला , बसू द्यायला तयार नाहीत. करोनाची भीती गेली आहे. लोकांना आणि मुलांना आता शाळा हवी आहे अशी पालकांची मानसिकता आहे.
शिक्षणमंत्री म्हणाल्या, “सध्या करोना वाढत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितच काही निर्णय घ्यावे लागतील. या महिन्याच्या १५ तारखेला शाळा सुरु होतील. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता शाळा सुरु ठेवणे आवश्यक आहे. शाळा, शिक्षक, वही असं वातावरण असणं आवश्यक आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी टास्क फोर्सशी आम्ही चर्चा करू आणि नंतरच एसओपी जाहीर करु. सध्या सर्व मुलांची करोना चाचणी करण्याची गरज नाही. राज्य आणि केंद्र सरकारचे करोना प्रतिबंधक नियम वेगळे आहेत. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करुनच एसओपी जारी केली जाईल.
496 Total Likes and Views