भाजपचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. सोलापूर दौरा रद्द करून देवेंद्र मुंबईला परत निघाले तेव्हाच चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांना ताप होता आणि चाचणीत ते पॉझटिव्ह निघाले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचं आणि आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी असे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पोटात गोळा उठला आहे.
राज्यसभा निवडणूक १० जून रोजी आहे. ह्या निवडणुकीतली सहावी जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. आता देवेंद्र बाहेर निघू शकणार नसतील तर भाजप अडचणीत येईल. तसे झाले तर भाजपचे एक मत कमी होईल. सेनापतीच आजारी म्हटला तर सैन्य भरकटू शकते. अचानक निर्माण झालेल्या ह्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी भाजपने तातडीची बैठक बोलावली आहे.
पण एक आशेचा किरण आहे. महापालिका नियमानुसार तीन दिवस त्यांना वेगळे राहावे लागेल. तिसऱ्या दिवशी त्यांची चाचणी होईल ही चाचणी निगेटिव्ह आली तर देवेंद्र बाहेर पडू शकतात. त्यामुळे आता राज्याचे लक्ष ह्या तिसऱ्या दिवसाकडे राहील.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींनाही करोनाची लागण झाल्याचं समोर येऊ लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटव
रून ही माहिती दिली आहे. मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींनाही करोनाची लागण झाल्याचं समोर येऊ लागलं आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
157 Total Likes and Views