सिब्बल, चिदंबरम यांच्यासह ४१ जण राज्यसभेवर बिनविरोध

Editorial
Spread the love

राज्यसभेवर जाण्यासाठी महाराष्ट्रात  अटीतटीची लढाई  सुरु आहे. .महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये  १६ जागांसाठी मतदान करावे लागले आहे.  पण तुम्हाला आश्चर्य वाटेल,  ११ राज्यांतील ४१ जागांवर खासदारांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ज्या ४१ जागांवर खासदार मतदानाशिवाय निवडून आले आहेत. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि छत्तीसगडसह ११ राज्यांच्या जागांचा समावेश आहे. निवडून येणाऱ्यांमध्ये नुकतेच काँग्रेस पक्ष सोडलेले कपिल सिब्बल, माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि राजीव शुक्ला यांचा समावेश आहे.

                उत्तर प्रदेशमधून ११ जागांवर मतदानाशिवाय करता खासदार निवडून आले आहेत. यात  ८ भाजपाचे आणि तीन सपाचे आहेत. भाजपाकडून लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ.राधामोहनदास अग्रवाल, महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा दर्शना सिंह, संगीता यादव, बाबुराम निषाद, राज्यसभा सदस्य सुरेंद्र कुमार नागर, डॉ.के. लक्ष्मण आणि माजी खासदार मिथिलेश कुमार यांचा या यादीत समावेश आहे. सपाकडून राज्यसभा सदस्य जावेद अली, आरएलडीचे जयंत चौधरी आणि सपाला पाठिंबा असलेले कपिल सिब्बल यांचा समावेश आहे.

                                  आंध्र प्रदेशातील चार जागांवर निवडून आलेले सर्व खासदार वायएसआर काँग्रेसचे आहेत. बिहारमध्ये भाजपाकडून सतीशचंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल, जेडीयूकडून खिरू महतो तर आरजेडीकडून मीसा भारती आणि फयाज अहमद राज्यसभेचे खासदार बनले आहेत. तामिळनाडूतून सहा खासदार मतदानाशिवाय निवडून आले आहेत. काँग्रेसकडून पी चिदंबरम निवडून आले आहेत. मध्य प्रदेशात भाजपला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मिकी भाजपाकडून तर विवेक तनखा काँग्रेसकडून निवडून आले. तर, ओडिशातील तीनही जागा बीजेडीच्या बाजूने गेल्या आहेत. तेलंगणात दोन जागांवर टीआरएसचे बी. पार्थसारधी रेड्डी आणि डी. दामोदर राव. छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि रंजीत रंजन बिनविरोध निवडून आले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला दोन्ही जागा मिळाल्या.

 249 Total Likes and Views

0 Comments

No Comment.