अनिल फिरोजीया हे मध्य प्रदेशातील उज्जैन मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागे त्यांना गंमतीने म्हटले होते, ‘तू वजन कमी कर. तुला एका किलोमागे एक हजार कोटी रुपये देईन’ फिरोजीया यांनी हे मनावर घेतले आणि फार कमी कालावधीत 15 किलो वजन कमी करून दाखवले. फिरोजिया म्हणतात, एका ‘जाहीर कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मला सांगितले की जर मी वजन कमी करण्याचे आव्हान पूर्ण केले तर ते उज्जैनमधील विकासकामांसाठी 1000 कोटी रुपये देतील. त्यांचे आव्हान मी स्विकारले. आतापर्यंत तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे. आता त्यांनी मला 15,000 कोटी रुपये द्यावेत.
फिरोजीया यांना पैसे मिळतील तेव्हा मिळतील. पण त्यांनी स्वतःला हलके कसे केले याची देशात उत्सुकता आहे. फिरोजिया यांनी सांगितले की, ते आता रोज पहाटे 5.30 वाजता उठतात आणि नंतर मॉर्निंग वॉकला जातात. त्यानंतर व्यायाम आणि योगासने करतात. वर्कआऊटसोबत डाएट प्लॅन पूर्णपणे फॉलो केला. दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात सॅलेडसोबत मिश्र धान्याच्या पिठापासून बनवलेली चपाती खायचो. नाश्ता हलका असायचा. कधी कधी मध्येच भूक लागली तर गाजर सूप किंवा ड्रायफ्रुट्स खायचो.
435 Total Likes and Views