संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. चार वर्षांनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उरलेल्या २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.“सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने आज ऐतिहासिक निर्णय घेऊन ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, “या योजनेमुळे सैन्य दलांमध्ये फिटनेसची पातळी आणखी सुधारेल. सध्या भारतीय सशस्त्र दलाचे सरासरी वय ३२ वर्षे आहे. ही योजना लागू झाल्यानंतर २४ ते २६ वर्षांचे असेल. एवढेच नाही तर लष्कराला उच्च कौशल्य संसाधनेही मिळू शकतील. अग्निवीरांसाठी चांगले पे-पॅकेज उपलब्ध असेल. याशिवाय बाहेर पडताना चांगली रक्कम दिली जाईल.”अग्निवीरने सेवेदरम्यान सर्वोच्च बलिदान दिले तर त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. याशिवाय अपंगत्व आल्यास ४८ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. अग्निपथच्या माध्यमातून सैन्याचा भाग बनलेल्या सैनिकांना दरमहा ३० हजार ते ४० हजार रुपये पगार मिळणार आहे. यासोबतच त्यांना ४८ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैनिकांना कौशल्य प्रमाणपत्र’ मिळेल, जे त्यांना सैन्यात सेवा दिल्यानंतर इतर नोकऱ्या मिळवण्यास मदत करेल
581 Total Likes and Views