उद्धवसाहेब, कृपया एवढे वाचा.

News
Spread the love

प्रिय, उद्धवसाहेब….
तुम्ाच्याशी आज बोलायचे आहे… हे खुले पत्र समजा.. संपर्क होणे कठीण… फोन लागणे कठीण… सरकार स्थापन झाले तेव्हा, तुम्ही स्वत:हून दोन-तीन वेळा फोन केलात. तुम्ही आज सत्तेवर आहात. पण तुमचा स्वभाव सरळ आहे. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही सत्तेवर नव्हता, तेव्हाची गोष्ट. मी आिण माझा डी.टी.पी. अॅापरेटर संतोष श्रृंगारे बांद्र्याच्या पुलावरून चालत जात होतो. पाठीमागून तुमची गाडी आली… मला तुम्ही पाठमोरे ओळखलेत… गाडी थांबवलीत… खाली उतरलात… ‘जय महाराष्ट्र’ म्हणालात… आिण पुढे म्हणालात… ‘का चालत निघालात?… गाडी नाही का?’ मी तेव्हा कालिना येथे राहत होतो. ‘गाडी नाही’ म्हटले.  तुम्ही म्हणालात, ‘चला सोडतो.’ तुमच्या शब्दांत अगदी सहजपणा होता आिण मोठेपणाही होता. मी म्हटले, ‘रिक्षा करतो, जवळच आहे.’ तुम्ही थापा ला खाली उतरवलेत… रिक्षा पकडून द्यायला सांिगतलेत… या गोष्टीला ८ वर्षे झाली. २०१९ ला  मुख्यमंत्री झालात… २०२० ला महाराष्ट्र राज्याला ६० वर्षे झाली. त्यावेळी मी ‘महाराष्ट्र – ६०’ हा ३८० पानांचा ग्रंथ प्रसिद्ध केला… त्याची कच्ची प्रत तुम्ाच्या हातात विधानभवनात िदली. पत्र िदले. या पुस्तकाचे प्रकाशन १ मे रोजी करावे, अशी विनंती केली. तुम्ही ‘बघू’ म्हणालात… गेल्या ६० वर्षांचा महाराष्ट्राचा सामािजक, राजकीय, सांस्कृतिक इितहास या पुस्तकात आहे. बाळासाहेब ठाकरेही आहेत… िशवसेनेची निर्मितीही आहे.. सगळेच राजकीय प्रवाह, सामाजिक प्रवाह आहेत. तुम्ही रात्री फोन केलात… आिण म्हणालात की, ‘आमची शिवभोजन योजना त्यात नाही…’ मी म्हटले ‘आहे… फोटोसह आहे.’ पण का कोणास ठावूक, तुम्ाच्याकडून वेळ मिळाला नाही. कोरोनाच्या कठीण काळात मी या पुस्तकाची निर्मिती केली. संपूर्ण रंगीत ३८० पानांचे ५०० रुपये िकमतीचेे पुस्तक विधानमंडळाला ४०० रुपयांप्रमाणे४०० प्रती  दिल्या. प्रकाशन झाले नाही म्हणून गेली दोन वर्षे त्या प्रती गोडावूनमध्ये पडल्या आहेत. आता त्याचे महत्त्वही संपले. माझे आर्थिक नुकसान झाले ते सोडून द्या… माझा उद्देश होता की, ६० वर्षांचा महाराष्ट्र आमदारांपर्यंत जावा… िकती जण वाचतील ते मािहती नाही… पण माझे समाधान… प्रकाशन झाले नाही त्याबद्दल माझी तक्रार नाही. त्यासाठी हे पत्र नाही. एका आत्मियतेने पत्र लिहितो आहे. आपण  ‘अखंड महाराष्ट्रा’चा पुरस्कार करणारे आहोत. १५ वर्षांपूर्वीच्या अखंड महाराष्ट्र परिषदेला ‘रंगशारदा’ येथे तुम्ही मला प्रमुख वक्ता म्हणून बोलावलेत. आज त्याची आठवण होते.
पत्र वेगळ्या कारणाकरिता आहे. २-३ वेळा फोनवर बोलणे झाले… नंतर संवाद संपला. मला तुम्ाच्याकडे काही मागायचे नाही… पण अनेक गोष्टी बोलायच्या असतात. प्रशासन किंवा मुख्यमंत्रीपद याचा अनुभव नसताना तुम्ही फार हिमत्ाीने राज्य हातात घेतलेत. सुरुवातीला राज्याला चांगली गती होती. नंतर प्रशासन आिण सगळेच राज्य संकुचित झाले. आत्मकेंद्रीत झाले. सामान्यांसाठी तुम्ाची भेट कठीण झाली. तुमच्या तीन्ही पक्षांतील मंत्रीसुद्धा भेटणे कठीण झाले. कोरोनामुळे मंत्रालयात प्रवेशबंदी होती. हे मान्य. पण, तरीही अन्य मार्गाने लाेकांशी संवाद साधता आला असता. तसा संवाद तुटलेला आहे. आता मंत्रालयात प्रवेशबंदी नाही. पण  तुम्ही मािहती घ्या…. ‘एकेका मंत्र्याकडे किती फाईल्स तुंबलेत….’, बुधवार-गुरुवार सोडून िकती मंत्री मुंबईत असतात? व्यक्तीगत कामाला फार महत्व मी देत नाही. पण सार्वजनिक कामांमध्ये महाराष्ट्राचा ग्रामीण भाग दुर्लक्षित आहे. आताचे सरकार वरळीभोवतीच िफरत आहे… कोस्टल रोड कल्पना चांगली आहे. प्रगत देशांमध्ये हे असे व्हायलाच हवे. पण हे चार चाकी गाडीवाल्यांकरिता आहे. बहुसंख्य उड्डाणपूल चार चाकी वाल्यांकरिताच आहेत. तुमचे सरकार ‘चारचाकी’ नाही.  ‘तीनचाकी’ आहे. थोडक्यात ‘िरक्षा’ आहे असेच समजा. त्यात कमीपणा नाही… कारण ‘िरक्षा’ हे सामान्य माणसांचे वाहन आहे. मुंबई आिण महाराष्ट्रातील ९० टक्के उड्डणापुलांवर रिक्षा, सायकल, दुचाकी, पादचारी यांना बंदी आहे. म्हणजे एवढी मोठी गुंतवणूक चारचाकीवाल्यांकरिता आहे. तुम्ाच्या मािहतीकरिता सांगताे, हा कोस्टल रोड करा… पण, यावरून जाणारा चारचाकीवाला जो दहीसरच्या पुढे बोरिवली, कांदिवली, जाणार आहे… तो सगळा भाजापाचा मतदार आहे. राज्याचा विकास करताना पक्षीय विचार तुम्ही करत नाहीत. आिण करूही नये, हे मान्य. पण, जे काही चालले अाहे, त्यात सामान्य माणसांकरिता नेमके काय आहे? ग्रामीण भागातील सामान्य माणसांकरिता नेमके काय आहे? ते सांगता येईल काय? संयुक्त महाराष्ट्र निर्माण करताना शेकरी आिण कामगार लढले.  १०६ हुतात्म्यांमध्ये कामगार आिण शेतकरी िकती आहेत बघा…. गेल्या ६० वर्षांत हाच कामगार आिण हाच शेतकरी भरडला गेला. कामगार चिरडला गेला… शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. या सगळ्याचे िचंतन झालेले नाही. लढले कोण…. मेले कोण… गब्बर झाले काेण…. याचेही िचंतन झालेले नाही. याला तुम्ही जबाबदार आहात, असे अिजबात म्हणणे नाही. पण हे सुधारण्याची संधी तुम्हाला परमेश्वराने िदलेली आहे.  केवळ भाषणबाजी आिण प्रसिद्धीने राज्य चालणार नाही. केंद्र सरकार तुम्हाला घेरायला टपले आहे, हे मािहती आहे.  पण गेल्या दोन वर्षांपूर्वी जी सहानुभूती निर्माण झाली होती, ती आज रािहलेली नाही, हे माझे िनरीक्षण तुम्हाला मुद्दाम सांगतो. जर ते चुकले तर, मला आनंद आहे. ते िनरीक्षण चुकावे, अशीच माझी इच्छा आहे. पण महाराष्ट्रभर िफरतो आहे. अनेक लोकांशी बोलतो अाहे, काही विपरित ऐकायला मिळत आहे. मुंबईत तर त्याहून विपरित. तेव्हा या सगळ्यांचा आपण िवचार करा… तुम्ाच्या भोवतीचे लोक आभाळाला हात लागल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांना आवरा. त्यांची निवेदने थांबवा… त्यांची प्रसिद्धी थांबवा… दोन वर्ष त्यांना गप्प बसायला सांगा… थोडं कटू आहे, पण मुद्दाम सांगताेय… संजय पवार यांचा पराभव झाला…. एक कट्टर शिवसैनिक पराभूत झाला, याची प्रतिक्रिया वाईट आहे. तुम्ही त्याला संधी िदलीत ही चांगली गोष्ट झाली. पण त्याचवेळी काय वाट्टेल ते झाले तरी ‘माझा कट्टर िशवसैनिक पराभूत होणार नाही’, ही जबाबदारी तुमची होती. तुम्ही सुभाष देसाई यांना विधानपरिषदेकरिता थांबवलेत…. त्यांनी स्वत:हून थांबण्याची भूमिका घेतली होती. फार भला माणूस आहे तो… त्यामुळे एका आिदवासी िशवसैनिकाला तुम्ही संधी िदलीत. दोन्ही भूमिका तुम्ही चांगल्या घेतल्यात. पण, संजय पवार पराभूत झाले. ही गोष्ट योग्य झाली नाही. १८ वर्षे राज्यसभा दिलेल्या संजय राऊत यांना तुम्ही भरपूर दिले होते… संघटक म्हणून त्यांचा फार काही उपयोग नाही. पेपरबाजीच जास्त आहे. संपादकांनी आप्ाल्याकरिता किती जागा वापरावी, याचेही भान सुटले आहे. १८ वर्षांत राज्यसभेत महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी ते किती लढले, याचा हिशोब देता येत नाही. त्यांना थांबवून संजय पवार यांना तुम्ही निवडून आणले असते, तर त्याचा महाराष्ट्रात फार चांगला संदेश गेला असता. एका व्यक्तीला २४ वर्षे राज्यसभेची गरज नाही. िशवसेनेमध्ये जीवाला जीव देणारी अनेक नेतेमंडळी आहेत. खासदार अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आल्याबरोबर त्यांनी स्वत:हून मंत्रीपदाचा राजीनामा िदला. गेल्या दोन वर्षांत ते कोठेही िदसत नाहीत. त्यांचे फोटो सामनात नाहीत. असे अनेकजण आहेत.  जे पुढे पुढे करत नाहीत अशांच्या मनाचा वेध घ्या. सामान्य िशवसैनिकांसोबत व्यक्त्ाीगत बोला… तो काय म्हणतो, ते ऐका…. मग तुमच्या लक्षात येईल की, काही तरी िबघडले आहे… काहीतरी चुकते आहे… हे वेळीच सावरले नाही तर, पुढची दोन वर्षे कठीण आहेत. हे मी याकरिता लिहतो आहे की, ५० वर्षे एकाच भूमिकेवर मी ठामपणे लिहीत आहे. तुमची २५ वर्षे सडली, हे तुम्हाला २०१९ ला जाणवले. जे मी गेली ५०वर्षे सांगतोय… आता पुढच्या दोन वर्षांत फार वेगळे राजकारण होईल. ते ध्यानात घ्या… डावपेचांची आखणी करा. सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधा. फरक नक्की होईल. काही माणसं तुटत चालली आहेत. मनाने पण आिण शरीरानेपण. त्याचा फायदा भाजपावाले घेत आहेत. २० जून ला विधानपरिषद िनवडणूक आहे. ितथं मतं फुटण्याची भीती आहे. कारण गुप्त मतदान आहे. आता नुसता ‘घोडेबाजार’ शब्द होता. राज्यसभेच्या विजयामुळे भाजपाचे घोडे आता उघडपणे बाजारात उधळतील. मनापासून सांगतो, तुम्ही एका आिदवासी शिवसैनिकाला विधान परिषदेत पोहोचवण्यासाठी संधी िदलीत. आता तो कोणत्याही परिस्थितीत विजयी झालाच पाहिजे. आपल्या सगळ्यांसाठी हे आव्हान आहे. दुर्दैवाने दगा-फटका झाला तर त्याचा फार वेगळा संदेश समाजात जाईल. म्हणून बांधणी नीट करावी लागेल. तुम्हाला त्याची कल्पना आहेच. पण जे काही बाहेर सुरू आहे, ते वेगळे आहे.
विधानपरिषद निवडणूक ही छोटी िनवडणूक आहे. नंतर मंुबई महापािलका… राज्यात सत्तेवर भाजापा असताना त्यांना अंगावर घेवून तुम्ही हिंमतीने मुंबई महापािलका शिवसेनेला िजंकून दिलीत. यावेळच्या मुंबई महापालिका िनवडणुकीत तर मोदी-शहा गल्लीबोळांतील सभांसाठी उतरतील. नंतरच्या विधानसभा िनवडणुकीत तीन पक्षांची आघाडी होते की, नाही ते काय सांगता येणार? त्यामुळे फार मोठ्या शक्तीमान शत्रूशी लढायचे आहे… केवळ ‘सामना’तील हेडलाईनवर हे काम होणार नाही. हे आताच स्पष्ट सांगतो. तुम्हाला बाहेर पडावे लागेल. दोन वर्षे संघर्षांची आहेत… महाविकास आघाडी तर िटकायलाच हवी…. पण परस्पर संवाद जास्त हवा. कारण, सगळी ताकद लावून भाजप बंगालच्या निवडणुकीत ममता दीदीला नामशेष करण्याकरिता उतरला होता. त्याही पेक्षा अिधक आक्रमक महाराष्ट्रात धाड येईल. त्याचा सामना करताना केवळ ‘सामना’ हातात आहे म्हणून, मुकाबला होणार नाही. तुमच्या िशवसेनेतील ज्या नेत्यांच्या बद्दल बाहेर कमालीचा असंतोष आहे, त्यांना जरा आवरा… तुम्हाला हे कोणी स्पष्ट सांगणार नाही… पण, तुमच्या खांद्यावर मी उभा असल्यामुळे…. पुढच्या िपढीचा असल्यामुळे  मला लांबचे िदसते आहे. आिण ते असे िदसत अाहे की, एक नंबरसाठी भाजपा प्रयत्न करेल. दोन नंबरला राष्ट्रवादीवाले राहितील. तुम्ही तीन नंबरला घसराल आिण काँग्रेस चौथ्या नंबरला जाईल. हे उद्याचे िचत्र आहे. तुम्हाला आवडो िकंवा न आवडो. पटो किंवा न पटो. ज्यांच्याबद्दल मनापासून प्रेम वाटते त्यांना धोका सांगणे, हे माझे काम आहे. आपला संवाद नसल्यामुळे प्रत्यक्ष बोलता येत नाही. बोलायचेच नाही, असे ठरवले तर मग हे सांगाणार कधी? अाणि सांगणार कोणाला? म्हणून यातील उद्देश तुम्हाला समजेल, असे समजतो. आणि हा उद्देश समजला तर, गैरसमज होणार नाही. पण मी आता अशा मताला आलेलो आहे की, गैरसमज झाला तरी चालेल… पण हे बोलावे लागेल. नाहीतर उद्याचा महाराष्ट्र मला विचित्र िदसतो आहे. फडणवीस यांनी एक जागा िजंकली तर प्रसार माध्यमांवर त्यांनी ‘जग िजंकल्यासारखी’ चर्चा होते. आपण एक जागा हारलो तर िकती आदळ-आपट करायची, हे तुमच्या मंडळींना जरा समजावून सांगा… पुढच्या काळात प्रसारमाध्यमे आपल्या विरुद्ध राहणार…. भावनात्मक विषय तापवले जाणार… ज्यांना फक्त टाळ्या िमळतात, मते िमळत नाहीत, ज्यांचे लोक िनवडून येत नाहीत त्या ‘मनसे’लाही सगळी शक्ती पुरवली जाणार. ज्यामुळे मतांचे िवभाजन होईल. देशात ओवेसी-मायावती यांच्यावर जे काम सोपवले आहेे ते काम ते करत आहेत. आता त्याच रांगेत मनसे नेते आहेत. हे सगळे धोके लक्षात घ्या. जे राजकारणात नाहीत पण ज्यांचा भाजपाला विरोध आहे, अशा समविचारी नेत्यांशी चर्चा करा… शक्तीने ते कमी असतील पण, एक काठी मोडता आली तरी दहा काठ्या एकत्र केल्यावर, त्या मोडता येत नाहीत. हा व्यवहारातला अनुभव आहे. ठाणे जिह्यात िकसानसभा फार शक्ती मोठी आहे. त्यांच्याशी बोलायला काय हरकत आहे? अतिशय शांतपणे, कसलेही भाषणबाजी न करता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ िशंदे किती मजबुतीने काम करत आहेत. पेपरबाजी नाही, फोटो नाहीत… निरगाठी सोडवण्याकरिता त्यांचा चांगला उपयोग आहे.
जे मनात आले ते लिहीले. पुढचे िदवस सोपे नाहीत, हे िदसत असल्यामुळे लिहिले आहे. तूर्त: एवढेच….
– मधुकर भावे

 259 Total Likes and Views

0 Comments

No Comment.