धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आजारी आहेत. सध्या त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना १३ जून रोजी पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. फेसबुकवरुन प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी ही महिती दिली.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी आले असता त्यांना ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळली. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यूमोनियावर उपचार सुरु असताना केलेल्या काही चाचण्यांमधून डॉ. आमटे यांना प्राथमिक अवस्थेतील रक्ताचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. तीन दिवसांच्या उपचारानंतर डॉ. आमटे यांना घरी सोडण्यात आलं असून पुढील उपचार कसे असतील यासंदर्भातील माहिती अनिकेत यांनी डॉ. आमटेंच्या फेसबुक पेजवरुनच दिली आहे. ते लिहितात, “बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. दोन तीन दिवसांनी तपासणी होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड व्हॅल्यूज ठीक असल्यास आठ ते दहा दिवसांत केमोथेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच, असं म्हणत अनिकेत आमटेंनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
ह्या माहितीसोबतच लोक बिरादरीमधील दहावीच्या मुलांचा उत्तम निकालही त्यांनी दिला आहे हे विशेष.
145 Total Likes and Views