नागपूर,
देशातील सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या नॅशनल वेब मिडियाचे उपक्रम गौरवास्पद अभिनंदनीय असल्याचे मत खादी ग्रामोद्योगचे राष्ट्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता यांनी व्यक्त केले. एनडब्ल्यूएमतर्फे आयोजित ‘विदर्भ प्राइड अवॉर्ड २०२२ ‘ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. एनडब्ल्यूएमचे संचालक महेश श्यामकांत पात्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर, स्नेहल दाते आणि एनडब्ल्यूएमचे प्रशांत लांजेवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला इंडियन टीव्ही शो ससुराल सिमरका शोमधील परी सचदेवा, क्यूँ उत्थे दिल छोड आयेमधील बिंदू प्रताप सिंग आणि शक्ती सीरियलमधील रेखा बन्सलची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता सिन्हा यावेळी आवर्जून उपस्थित होती.

विदर्भ प्राइड बुक ऑफ रेकॉर्ड २०२२ चे ब्रँड ॲम्बेसेडर समाजसेविका डॉ. नीना वानखेडे, नागपूर लेडीज क्लबच्या संचालिका सोनिया परमार, मॉडेल आणि समाजसेविका रश्मी तिरपुडे, उद्योजिका विजेता तिवारी यांचे स्नेहल दाते यांनी बच लावून स्वागत केले. तसेच सामाजिक कार्यकर्ता अश्विनी चौलवार, वैशाली ठाकुर – प्रोप्रिएटर फिटजोन फिटनेस सेंटर, उद्योजिका रोहिणी साळुंके (मुंबई), आर्टिस्ट रंजना अशोक शिंगाडे, छंद सम्राट दिलीप डहाके, फाऊंडर ऑफ विजिडम वर्ल्ड दिप्ती छाचरा, समाजसेविका उपेंदर कौर भसीन, झुंबा इन्स्ट्रॅक्टर सोनिया गडी, समाजसेविका कांचनमाला माकडे, छंदिष्ट डॉ. दीपक संत, लालित्य फाउंडेशनचे प्रसाद पिंपरीकर, प्रोफेसर डॉ. शुभांगी खांडेकर – बागडे, कत्थक नृत्य आणि योगा शिक्षक हर्षा नायगावकर, भारती महेश देशमुख, भावना डिझायनरच्या मालक रक्षांदा पाटणे, उद्योजिका सुप्रिया दमके, भरत नाट्यम डान्सर आणि मोडेल अवनी अखिल तिवारी, जगदंबा महिला फाउंडेशनच्या संचालिका श्वेता देशमुख, समाजसेविका डॉ. सारिका महेश शाह (अमरावती), विदर्भातील पहिली ट्रान्स जेंडर लोक अदालत पनेल मेंबर जज विद्या कांबळे, मोटिवेशन ट्रेनर नरेंद्र पलांदुरकर आदींना मान्यवरांच्या हस्ते अवॉर्ड आणि सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.
संचालन रजनी चव्हाण यांनी, तर प्रास्ताविक कांचनमाला माकडे यांनी केले.
















































352 Total Likes and Views