‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ कलाकारांचा जल्लोष, म्हणाले; आम्ही पुन्हा आलो, पण ‘हा’ जल्लोष नक्की कुणासाठी..?

Entertainment News
Spread the love

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अनेक ध’क्का तंत्र पाहायला मिळत आहेत. सध्या सत्तेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि त्यांना काही वेळातच पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली.

त्यामुळे त्यांची ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा सत्यात आली. मात्र, अशा पद्धतीने ती सत्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामागे नेमके काय राजकारण आहे, हे अजून कोणालाही कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सूचनेवरून देवेंद्र फडणवीस यांचे पंख छा’टण्याचे काम झाल्याचे सध्यातरी सांगण्यात येत आहे.

मात्र, आता ‘आम्ही पुन्हा येईन’ ही घोषणा एका मराठी मालिकेतील कलाकारांनी देखील दिली आहे. मात्र त्यांची ही घोषणा नेमकी कशासाठी आहे जाणून घेऊया. ही मालिका दुसरी तिसरी कुठलीही नसून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका स्टार प्रवाह वर गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे.

महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. मात्र, या मालिकेवर गेल्या काही दिवसापासून प्रेक्षक टी’का करत होते. कारण मालिकेमध्ये अतिशय विचित्र ट्रॅक दाखवण्यात येत होते. ही मालिका जयदीप आणि गौरी यांच्यावर आधारित असली तरी या मालिकेमध्ये इतर भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

या मालिकेमध्ये जयदीपची भूमिका अभिनेता मंदार जाधव याने साकारली आहे, तर गौरीची भूमिका अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने साकारली आहे. या मालिकेमध्ये अनेक वर्षानंतर वर्षा उसगावकर देखील दिसली आहे. वर्षा उसगावकर यांनी या मालिकेमध्ये माईची भूमिका साकारली आहे.

मीनाक्षी राठोड ही देखील या मालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका करताना दिसत आहे. मध्यंतरी तिने बाळाला जन्म दिल्यामुळे तिने काही दिवसांसाठी आता ब्रेक घेतला आहे. शिर्के पाटील कुटुंबियांमध्ये काय घटना घडामोडी घडतात हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. माधवी निमकर हिने देखील या मालिकेमध्ये शालिनी वहिनी ही भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने साकारली आहे, तर ज्योतिकाची भूमिका सायली साळुंखे हिने साकारली आहे.

उदय शिर्के पाटील ही भूमिका अभिनेता संजय पाटील यांनी साकारली आहे. तर मानसीच्या भूमिकेमध्ये आपल्याला अश्विनी केसकर दिसली आहे. सुनील गोडसे यांनी देखील या मालिकेत चांगले काम केले आहे, तर मिलिंद शिंदे यांनी भैरू पैलवान साकारला होता, तर आता या मालिकेतील कलाकारांनी चांगलाच जल्लोष केला आहे.

याचे कारण अनेकांना समजले नव्हते. मात्र या मालिकेने आता टीआरपीच्या बाबतीत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे या मालिकेच्या सगळ्या कलाकारांनी ‘आम्ही पुन्हा आलो’ असं म्हणून जंगी सेलिब्रेशन केले आहे. टीआरपीच्या बाबतीत ही मालिका सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. मालिकांसाठी टीआरपी हा खूप महत्त्वाचा असतो.

त्यावरूनच तुमची मालिका किती जण पाहत आहेत, हे ठरत असतं आणि त्यामधूनच तुम्हाला उत्पन्न मिळत असतं. आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने या आठवड्यात 6.8 टीआरपी रेटिंग सह पहिला क्रमांक मिळवला आहे. मागील काही महिन्यांमध्ये जयदीप आणि गौरी यांच्यामध्ये झालेला दुरावा प्रेक्षकांना आवडला नव्हता.

त्यामुळे ही मालिका पहिल्या टॉप टेन मध्ये आठव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली होती. मात्र, आता मालिकेने ट्रॅक बदलला आहे. त्यामुळे ही मालिका अनेक जण पाहत आहेत. सध्या मालिकेमध्ये शिर्के पाटील यांच्या वंशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा ट्रॅक आवडत असून प्रेक्षक ही मालिका आता जास्त प्रमाणात पाहत आहेत.

माधवी निमकर हिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कलाकार आनंदाने डान्स करताना दिसत आहेत. बऱ्याच दिवसांनी ‘आम्ही नंबर वन वर आलो’, ‘आम्ही पुन्हा आलो’, ‘ आम्ही पुन्हा आलो’ असे ओरडून हे कलाकार सांगताना दिसत आहेत. या मालिकेला मिळालेले यश प्रेक्षकांनी देखील सेलिब्रेट केले आहे. एका प्रेक्षकांनी म्हटले आहे की, खूप आनंद झाला.

किती दिवसानंतर मालिका नंबर वन यावी यासाठी आम्ही वाट पाहत होतो. अनेकांनी हार्ट इमोजी देखील शेअर केली आहे. मागील दोन महिन्यापासून रंग माझा वेगळा ही मालिका टीआरपीच्या अवस्थानावर होती. मात्र आता ही सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अवल स्थानावर आली आहे. आई कुठे काय करते ही मालिका तिसऱ्या स्थानावर गेली आहे.

https://www.instagram.com/maadhavinemkarofficial

 324 Total Likes and Views

0 Comments

No Comment.