एकनाथ शिंदेजी अभिनंदन, पण.. ; राज ठाकरे यांच्याइशाऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Editorial
Spread the love

राज्यात सत्तासंघर्षाच्या राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणून शपथ घेतली आहे. शिंदे यांनी शिवसेनेला (Shivsena)मोठा धक्का देत एकूण ३९ आमदार आपल्या गळाला लावले. तसेच 11 अपक्ष आमदारांनी त्यांनी फोडले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) राजीनामा द्यावा लागला. (Raj Thackeray Latest Marathi News)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही शिंदे यांचे अभिनंदन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज यांनी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत एक इशारा दिला आहे.

आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन.खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन. दरम्यान, सावध कोणापासून राहा? हे मात्र राज ठाकरेंनी पोस्टमध्ये लिहिले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत.

 127 Total Likes and Views

0 Comments

No Comment.