शरद पवारांना धक्का ; महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल होताच आयकर विभागाने पाठविले नोटीस

Editorial
Spread the love

हाराष्ट्रामध्ये सत्ताबदल होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अगोदर शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने समन्स पाठविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar)आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.

मला इन्कम टॅक्सचे प्रेमपत्र आलेय. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये लढविलेल्या लोकसभा-राज्यसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रांवरून मला नोटीस पाठविण्यात आली आहे, असे शरद पवार म्हणाले.

तर महाराष्ट्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर लगेचच आयकर विभाग शरद पवार यांना नोटीस देतो. हा पूर्ण योगायोग आहे की आणखी काही? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश भरत तपासे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.

 165 Total Likes and Views

0 Comments

No Comment.